Pune Accident : तीन वाहने धडकली…10 जणांचा जागीच मृत्यू, एकाच कुटुंबातील चौघांचा गेला जीव

प्रशांत गोमाणे

• 04:04 AM • 18 Dec 2023

जुन्नर तालुक्यातील डिंगोरे गावाजवळ अंजीराची बाग येथे रविवारी रात्री ट्रक, टेम्पो आणि रिक्षा यांचा विचित्र अपघात झाल्याची घटना घडली आहे. रविवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.

pune accident news ahmednagar kalyan highway road accident 10 people death shocking story from pune

pune accident news ahmednagar kalyan highway road accident 10 people death shocking story from pune

follow google news

Pune Accident News : स्मिता शिंदे, जुन्नर,पुणे : पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अहमदनगर-कल्याण महामार्गावर विचित्र अपघाताची घटना घडली आहे. ट्रक, पिकअप आणि रिक्षाचा विचित्र अपघात झाला आहे. या तिहेरी अपघातात 10 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये 4 वर्षाच्या मुलाचा आणि 6 वर्षाच्या मुलीचा समावेश आहे. हा अपघात जुन्नर तालुक्यातील डिंगोरे गावाजवळ अंजीराची बाग येथे झाला.(pune accident news ahmednagar kalyan highway road accident 10 people death shocking story from pune)

हे वाचलं का?

जुन्नर तालुक्यातील डिंगोरे गावाजवळ अंजीराची बाग येथे रविवारी रात्री ट्रक, टेम्पो आणि रिक्षा यांचा विचित्र अपघात झाल्याची घटना घडली आहे. रविवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातातील पिकअप ओतूरवरून कल्याणकडे जात होती, तर रिक्षा आणि ट्रक ओतूरकडे येत होते.रिक्षामधील सर्व प्रवासी मुंबईतील विक्रोळीचे होते तर पिकअप मधील प्रवासी जुन्नर तालुक्यातील मढ पारगावचे होते.

हे ही वाचा : अश्वजीतची चौकशी नाही, कारही गायब…, प्रिया सिंहचे पोलिसांवरच गंभीर आरोप

या भीषण अपघातात 10 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये जुन्नर तालुक्यातील मढ येथील भाजीपाला व्यवसाय करणारे पती,पत्नी व दोन लहान मुलांचा मृतांमध्ये समावेश आहे. गणेश मस्करे (वय 30), कोमल मस्करे (वय 25), हर्षद मस्करे (वय ४) आणि काव्या मस्करे वय 6 अशी या मृतांची नावे आहेत. तर या अपघातातील इतर सहा मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे.

दरम्यान या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने पोलिसांना फोन केला. ओतूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे आणि त्याच्या टीमने घटनास्थळी पंचनामा केला. पोलीस घटनास्थळी पोहचल्यावर मदत आणि बचावकार्य सुरु केले. पोलिसांना ग्रामस्थांनीही मदत केली. मृत्यू झालेल्या व्यक्तींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. या प्रकरणात अद्याप तरी चार जणांची ओळख पटवण्यात यश आले आहे. उर्वरीत सहा मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. या घटनेचा अधिक तपास सुरु आहे.

    follow whatsapp