–कृष्णा पांचाळ, पिंपरी चिंचवड
ADVERTISEMENT
Pune Crime News in marathi : सुट्टीच्या दिवशी पतीला देवदर्शनासाठी घेऊन गेली आणि स्वतः चाकूने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडमधून समोर आली आहे. पतीच्या हत्या करून लोकांनी खून केल्याचा बनाव रचणाऱ्या पत्नीला पोलिसांनी अवघ्या काही तासातच बेड्या ठोकल्या.
पुण्याच्या मावळमध्ये (म्हळुंगे) पतीच्या जाचाला कंटाळून पत्नीने पतीची हत्या केल्याची खळबळ घटना समोर आली. या घटनेनंतर पत्नीने पतीची तीन ते चार जणांनी हत्या केल्याचा बनाव देखील रचला होता. परंतु, तळेगाव पोलिसांनी अवघ्या काही तासातच पत्नीच्या संशयास्पद हालचाली आणि बोलण्याच्या विसंगतीवरून बेड्या ठोकल्या आहेत. सुरज काळभोर असं हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी अंकिता सुरज काळभोर ला तळेगाव पोलिसांनी अटक केलीय.
pune crime : पत्नीने का काढला पतीचा काटा?
सव्वा महिन्यापूर्वीच अंकिता आणि सुरजचा विवाह झाला होता. त्यांचे किरकोळ कारणावरून वाद होत असत. अशातच सुरज हा अंकिताचा शारीरिक छळ करायचा. तिला मारहाण करायचा. याच छळाला कंटाळून तिने पतीचा काटा काढायच ठरवलं.
अंकिताने बनवला सुरजच्या हत्येचा प्लान
रविवारी सुरजला सुट्टी असल्याने मावळमधील शिरगाव येथे असलेल्या प्रतिशिर्डीच्या दर्शनाला ती पतीला घेऊन गेली. त्यानंतर दोघेही जवळच असलेल्या त्यांच्या शेतात गेले. शेतात गप्पा मारत असताना लघुशंकेला जात असल्याचं ती सुरजला म्हणाली.
हेही वाचा >> Maharashtra politics : भाजपचा पुन्हा ‘माधव’ फॉर्म्युला, रणनीती ठरली!
नंतर अंकिताने दबक्या पावलांनी येत सुरजवर चाकूने हल्ला केला. त्यावेळी अंकिताने लघुशंकेचं नाटक केल्याचं सुरजच्या लक्षात आलं. अंकिताने पती सुरजच्या पाठीवर सपासप चाकूने वार केले. अचानक झालेल्या हल्ल्याने आणि जखमांनी सुरज खाली पडला. त्यानंतर अंकिताने त्याच्यावर टिकावाने घाव घातले.
हेही वाचा >> विवाहितेचा जंगलात सापडला मृतदेह! रक्तरंजित लव्हस्टोरी मोबाईलने…
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सुरतचा जागेवरच मृत्यू झाला. या घटनेनंतर सुरजचा अज्ञात तीन ते चार जणांनी हत्या केली असल्याचा बनाव पोलिसांसमोर अंकिताने रचला. परंतु पोलिसांना अंकिताच्या बोलण्यावरून संशय येत असल्याने पोलिसांनी ताब्यात घेऊन तिच्याकडे अधिक चौकशी केली असता तिने हत्या केल्याचं मान्य केलं.
ADVERTISEMENT