Ram Mandir in Ayodhya : अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन 22 जानेवारी रोजी होत आहे. त्यामुळे आता रामलल्लाच्या अभिषेक सोहळ्याची तयारीही जय्यतपणे सुरु आहे. रामललाच्या अभिषेकसाठी 84 सेकंदांचा शुभ काळ निवडण्यात आला असल्याचे सांगण्यात आले आहे. रामलल्लाच्या अभिषेकची वेळ 22 जानेवारी रोजी दुपारी 12:29 मिनिटे 8 सेकंद ते 12:30 मिनिटे 32 सेकंद अशी असणार आहे.
ADVERTISEMENT
22 जानेवारीचं विशेष महत्व
या मुहूर्ताबद्दल सांगताना विद्वान ज्योतिषांनी सांगितले की, 22 जानेवारी हा शुभ मुहूर्तानुसार अनेक वाणांच्या दोषांपासून मुक्त आहे. ही तिथी आणि हा शुभ काळ अग्नी, मृत्यू, चोरी, मृत्यू आणि रोग यांच्यापासून मुक्त असल्याचे सांगण्यात आले आहे.
सुरक्षेसाठी AI चा वापर
अयोध्येत राम लल्लाच्या अभिषेक होणात त्या दिवशी मोठी सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणामुळे अयोध्येला अनेक झोनमध्ये त्याची विभागण्यात करण्यात आली आहे. रेड आणि यलो झोनवर ड्रोनच्या साह्याने नजर ठेवली जाणार आहे. तर तेथील सुरक्षा व्यवस्थेसाठी पोलीस आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) देखील वापरणार आहेत. केंद्रीय सुरक्षा दलाबरोबरच राम मंदिराच्या सुरक्षेची जबाबदारीही यूपी एसटीएफकडे सोपवण्यात देण्यात आली आहे. अयोध्येत निमलष्करी दलांसोबत एनएसजी कमांडोही तैनात करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. श्री रामजन्मभूमीच्या सुरक्षेसाठी सुमारे 25 हजार जवान तैनात करण्यात येणार असून आत्मघाती हल्ले रोखण्यासाठीही विशेष पथकांची तयारी केली असून जय्यात तयारी केली गेली आहे.
सुंदर निमंत्रण पत्रिका
श्री प्रभूरामचंद्राच्या प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका ही सुंदर आणि आकर्षक करण्यात आली आहे. त्यामध्ये मंदिराचे भव्य चित्र असून भगवान श्री राम हे बालस्वरूपही त्यामध्ये चित्रित करण्यात आले आहे. त्यासोबतच एक पुस्तिकाही देण्यात आली आहे. त्यामध्ये रामजन्मभूमी आंदोलनाशी संबंधित लोकांची थोडक्यात माहिती देण्यात आली आहे.
हे ही वाचा >> #BoycottMaldives ट्रेंडनं मालदीवचे बुकिंग धडाधड रद्द, पर्यटनाची लागली वाट
खास निमंत्रण
मंदिर ट्रस्टकडून आमंत्रित केलेल्या लोकांच्या यादीत 7,000 हून अधिक लोकं आहेत. त्यामध्ये क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली, अभिनेते अमिताभ बच्चन आणि उद्योगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांचाही समावेश आहे. तर नुकताच आलिया आणि रणबीर कपूरलाही या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका देण्यात आली आहे. मंदिर ट्रस्टने पीटीआयला सांगितले की, कार्यक्रमासाठी विविध भागातील लोकांना आमंत्रित करण्यात आले आहे. त्यामध्ये अंतराळ संशोधनापासून ते कला क्षेत्रापर्यंतच्या लोकांचाही समावेश आहे. त्याच बरोबर विस्मृतीत गेलेल्या आदिवासी आणि वास्तुविशारदांनाही निमंत्रण दिल्याचे ट्रस्टकडून सांगण्यात आले आहे.
राम मंदिराची 20 वैशिष्ट्ये
1. हे मंदिर पारंपरिक आणि नगरशैलीमध्ये बांधण्यात आले जात आहे.
2. मंदिराची लांबी (पूर्व ते पश्चिम) 380 फूट, रुंदी 250 फूट आणि उंची 161 फूट आहे.
3. हे मंदिर तीन मजली असेल तरी प्रत्येक मजल्याची उंची 20 फूट असणार आहे. मंदिरात एकूण 392 खांब आणि 44 दरवाजे असणार आहेत.
4. मुख्य गर्भगृहामध्ये भगवान श्री राम यांचे बालरूप आणि पहिल्या मजल्यावर श्री राम दरबार असणार आहे.
5. मंदिरामध्ये 5 मंडप असणार असून नृत्य मंडप, रंगमंडप, सभा मंडप, प्रार्थना मंडप आणि कीर्तन मंडपाची रचना केली गेली आहे.
6. राम मंदिराचे खांब आणि भिंतींवर देव, देवी-देवतांच्या मूर्ती कोरल्या गेल्या आहेत.
7. सिंहद्वारपासून 32 पायऱ्या चढून गेल्यानंतर पूर्वेकडून मंदिरामध्ये प्रवेश होणार आहे.
8. मंदिरामध्ये अपंग आणि वृद्धांसाठी रॅम्प आणि लिफ्टचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
9. मंदिराभोवती आयताकृती भिंत असणार असून त्याच्या चारही दिशांना एकूण लांबी 732 मीटर आणि रुंदी 14 फूट असणार आहे.
10. उद्यानाच्या चार कोपऱ्यात सूर्यदेव, माता भगवती, गणपती आणि भगवान शिव यांना समर्पित चार मंदिरे बांधण्यात येणार आहेत. उत्तरेला अन्नपूर्णेचे मंदिर आणि दक्षिणेला हनुमानजींचे मंदिर असणार आहे.
11. राम मंदिराजवळ प्राचीन काळातील सीताकूप असेल.
12. मंदिर परिसरात प्रस्तावित इतर मंदिरे महर्षी वाल्मिकी, महर्षी वशिष्ठ, महर्षी विश्वामित्र, महर्षी अगस्त्य, निषादराज, माता शबरी आणि ऋषिपत्नी देवी अहिल्या यांना समर्पित असणार आहेत.
13. दक्षिण-पश्चिम भागातील नवरत्न कुबेर टिळ्यावरील भगवान शिवाच्या प्राचीन मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. तसेच तेथे जटायूचा पुतळाही बसवण्यात आला आहे.
14. या मंदिरामध्ये लोखंडाचा वापर केलेला नाही. तर जमिनीवर काँक्रीट घालण्यात आले नाही.
15.मंदिराच्या खाली 14 मीटर जाडीचा रोलर कॉम्पॅक्टेड काँक्रीट (RCC) टाकण्यात आला आहे. त्याला कृत्रिम खडकाचे स्वरूप देण्यात आले आहे.
16. मातीच्या ओलाव्यापासून मंदिराचे रक्षण करण्यासाठी ग्रॅनाईटचा 21 फूट उंच मंडप तयार केला गेला आहे.
17.मंदिर संकुलात सीवर ट्रीटमेंट प्लांट, वॉटर ट्रीटमेंट प्लांट, अग्निशमनासाठी पाण्याची व्यवस्था आणि स्वतंत्र पॉवर स्टेशन स्वतंत्रपणे बांधण्यात आले आहे.
18 . 25 हजार क्षमतेचे यात्रेकरू सुविधा केंद्र बांधण्यात येत आहे. तर भक्तांचे साहित्य ठेवण्यासाठी लॉकर आणि वैद्यकीय सुविधाही देण्यात येणार आहेत.
19. मंदिर परिसरात स्नानगृह, स्वच्छतागृह, वॉश बेसिन, उघडे नळांची सुविधाही देण्यात येणार आहे.
20. राम मंदिर हे पूर्णपणे भारतीय परंपरेनुसार आणि स्वदेशी तंत्रज्ञानावरच उभारले गेले आहे. तसेच पर्यावरण-जलसंवर्धनावर विशेष लक्ष दिले गेले आहे. तर एकूण 70 एकर क्षेत्रापैकी 70 टक्के क्षेत्र हे नेहमीच हिरवेगार राहणार आहे.
ADVERTISEMENT