RSS on Caste Census : जातनिहाय जनगणनेबद्दल संघाने बदलली भूमिका, पण…

योगेश पांडे

21 Dec 2023 (अपडेटेड: 21 Dec 2023, 09:08 AM)

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी आरएसएसची जातनिहाय जनगणनेबद्दल नेमकी भूमिका काय आहे, याबद्दल स्पष्टपणे निवदेन केले आहे.

According to RSS: While doing this it should be ensured that it does not create rifts, recently there has been discussion that caste based census should be conducted

According to RSS: While doing this it should be ensured that it does not create rifts, recently there has been discussion that caste based census should be conducted

follow google news

Caste Based Census RSS : देशातून जातीय विषमता नष्ट करायची असेल, तर जातनिहाय जनगणना व्हायला नको, अशी भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने घेतली होती. यावरून वाद-विवाद सुरू झाल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नव्याने भूमिका मांडली आहे. आरएसएसने जातनिहाय जनगणनेला पाठिंबा देताना एक सूचना केली आहे.

हे वाचलं का?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जातनिहाय जनगणनेबद्दल काय मांडली भूमिका?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे. यातून त्यांनी आरएसएसची जातनिहाय जनगणनेबद्दलची भूमिका मांडली आहे. वाचा काय म्हटलंय निवेदनात…

“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कोणत्याही प्रकारचा भेदभाव आणि विषमता मुक्त समरसता तसेच सामाजिक न्यायावर आधारित हिंदू समाज निर्माण करण्यासाठी सतत कार्यरत आहे. हे खरं आहे की, विविध ऐतिहासिक कारणांमुळे समाजातील अनेक घटक आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागे पडले आहेत.”

हेही वाचा >> ‘त्याचं भान मुख्यमंत्र्यांना नसेल’, राऊतांनी शिंदेंनाच दिलं चॅलेंज

“त्यांचा विकास, उत्कर्ष आणि सशक्तीकरणाच्या दृष्टीने वेगवेगळ्या सरकारांनी वेळोवेळी अनेक योजना आणि तरतुदी केल्या. त्याचं संघ पूर्णपणे समर्थन करतो. मागील काही काळापासून जातनिहाय जनगणनेची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.”

“आमचं मत असं आहे की, याचा उपयोग समाजाचा सर्वागिण उत्कर्ष करण्यासाठी व्हावा आणि हे करत असताना सर्व पक्षांनी याची खात्री करून घ्यावी की, कोणत्याही कारणाने सामाजिक समरसता आणि एकात्मतेला तडा जाणार नाही”, अशी भूमिका संघाने मांडली आहे.

हेही वाचा >> खरी शिवसेना कुणाची, कसं ठरणार? नार्वेकरांनी दिलं उत्तर

एकनाथ शिंदे जातनिहाय जनगणनेबद्दल काय म्हणालेले?

हिवाळी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही जातनिहाय जनगणेबद्दल भूमिका स्पष्ट केली होती. “महाराष्ट्र हे पुरोगामी विचारांचे राज्य आहे. या राज्याची संस्कृती इतर राज्यांपेक्षा वेगळी आहे. येथे सर्व जातीधर्माचे लोक आनंदाने सोबत राहतात. एकमेकांचे सण-उत्सव साजरे करतात. त्यामुळे राज्यात जातीय सलोखा, कायदा-सुव्यवस्था कायम राहायला हवी. या पार्श्वभूमीवर सर्व घटकांचा विचार जाणून घेत जनतेची भावना लक्षात घेऊन योग्य निर्णय घेण्यात येईल”, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रेशीमबागेतील स्मृती मंदिरस्थळी माध्यमांशी बोलताना म्हणाले होते.

    follow whatsapp