Ruby Franke : मुलांना उपाशी ठेवून Youtube वर द्यायची लोकांना धडे

प्रशांत गोमाणे

22 Feb 2024 (अपडेटेड: 22 Feb 2024, 09:47 PM)

Ruby Franke vlogger : रुबी सोशल मीडियावर लोकांना पालकत्वाचे धडे देते. मात्र प्रत्यक्षात ती स्वत:च्या घरातच मुलांचं शोषण आणि गैरवर्तन करत असल्याचं समोर आलं आहे. रूबी तिच्या मुलांना उपाशी ठेवते व त्यांच्यावर अत्याचार करत असल्या प्रकरणी आता कोर्टाने तिला दोषी ठरवले आहे.

रुबी सोशल मीडियावर लोकांना पालकत्वाचे धडे देते. मात्र प्रत्यक्षात ती स्वत:च्या घरातच मुलांचं शोषण आणि गैरवर्तन करत असल्याचं समोर आलं आहे. रूबी तिच्या मुलांना उपाशी ठेवते व त्यांच्यावर अत्याचार करत असल्या प्रकरणी आता कोर्टाने तिला दोषी ठरवले आहे.

ruby franke social media influencer sentenced jail for 60 year child abuse shockinh story

follow google news

Ruby Franke vlogger : सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. प्रत्येकजण व्हिडिओ बनवून प्रसिद्धी झोतात येण्याच्या मागे लागला आहे. अशाप्रकारे युट्यूबवर व्हिडिओ बनवणाऱ्यांना युट्यूबर किंवा सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर देखील म्हटले जाते. अशा सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर्सना लाखो-करोडो लोगो फॉलो करत असतात. असे असताना आता एका इन्फ्लूएन्सर्सबाबत धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना वाचून तुम्ही सोशल मीडिया इन्फ्लूएन्सरला फॉलो करणेच सोडून द्याल. त्यामुळे नेमकी ही घटना काय आहे? हे जाणून घेऊयात.  (ruby franke social media influencer sentenced jail for 60 year child abuse shockinh story) 
 
 अमेरीकेची एक इंन्फ्लुएन्सर आणि युट्यूबर आहे. तिचे नाव रूबी फ्रॅक आहे. ही रुबी सोशल मीडियावर लोकांना पालकत्वाचे धडे देते. मात्र प्रत्यक्षात ती स्वत:च्या घरातच मुलांचं शोषण आणि गैरवर्तन करत असल्याचं समोर आलं आहे. रूबी तिच्या मुलांना उपाशी ठेवते व त्यांच्यावर अत्याचार करत असल्या प्रकरणी आता कोर्टाने तिला दोषी ठरवले आहे. त्यामुळे या प्रकरणी तिला तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. उटाह येथील कोर्टाने हा निर्णय दिला आहे. कोर्टाच्या या निर्णयानंतर  रूबीच्या चाहत्यांना मोठा हादरा बसला आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : Shilpa Bodkhe : 'ठाकरेंच्या शब्दाला किंमत नाही...'

42 वर्षीय रुबी फ्रँक ही उटाह युनायटेड स्टेट्समधील एक कौटुंबिक व्लॉगर आहे, तिने घटस्फोटानंतर तिचा पती आणि व्यावसायिक भागिदार केविनसोबत दररोज व्लॉग बनवायला सुरुवात केली. YouTube चॅनेल "8Passengers"वर ते दोघे व्हिडिओ अपलोड करायचे. या चँनेलवर दोघेही 6 मुलांचे पालक म्हणून आपल्या दैनंदिन जीवनावर व्हिडिओ बनवून शेअर करायचे. 
  
यानंतर रूबी फ्रॅकने मॉमफ्लुएंसर नावाचे नवीन चॅनले सूरू केले होते. या चॅनलवर रूबी तिच्या चाहत्यांना पालकत्वाचे धडे द्यायची. मुलांचे संगोपण कसे करायचे? मुलांना कसे कपडे घालायचे? तसेच मुलांना कशापद्धतीने ओरडायचे? अशा सर्व विषयावर ती व्हिडिओ बनवून शेअर करायची. फ्रँक सर्व व्हिडिओ सेल्फी मोडवर बनवायची. कारण ती तिच्या व्हिडिओत मुलांशी संवाद साधायची त्यानंतर प्रेक्षकांना पालकत्वाचे धडे द्यायची. 

हे ही वाचा : सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या फिटनेसचं काय आहे सिक्रेट?

अशी झाली पोलखोल

कॅमेराच्या आत रूबी फ्रँक चाहत्यांना पालकत्वाचे धडे द्यायची.मात्र कँमेरामागे तिचं भलतचं रूप होतं. कँमेरामागे ती मुलांचा छळ करायची. या संबंधित एक व्हिडिओ तिच्याच अकाऊंटवरून शेअर झाल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उजेडात आला होता. त्यानंतर हे प्रकरण कोर्टात पोहोचल्यानंतर रूबीला तूरूंगवासाची शिक्षा सूनावण्यात आली. 

    follow whatsapp