Sachin Tendulkar’s Viral Deep fake video : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओतील चेहरा आणि आवाज सचिन तेंडुलकरचा आहे. या व्हिडीओमध्ये सचिन एका अॅपची जाहिरात करताना दिसत आहे. पण या व्हिडिओचे सत्य काही वेगळेच आहे. मास्टर ब्लास्टरच्या मते हे डीपफेकचे प्रकरण आहे. (Sachin Tendulkar’s Viral Deep fake video What he said on it)
ADVERTISEMENT
या व्हिडीओमध्ये सारा तेंडुलकर (सचिनची मुलगी) एक खास खेळ खेळते ज्यामुळे सचिनला पैसे कमावण्यास मदत होते, असे म्हटले आहे. ही व्हिडीओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर तेंडुलकरने यावर स्पष्टीकरण दिले आहे.
वाचा : Mahayuti : “मुंगीसुद्धा हत्तीचा पराभव करू शकते”, सदाभाऊंनी भाजपवर काढली भडास
दिग्गज क्रिकेटपटू म्हणाला की, तंत्रज्ञानाचा सर्रासपणे होणारा गैरवापर’ पाहून तो चिंतेत पडला आहे. त्याने चुकीची माहिती आणि डीपफेक्सचा प्रसार’ थांबवण्याचे आवाहन केले आणि लोकांना अधिक सतर्क आणि सावध राहण्यास सांगितले.
सचिन तेंडुलकरने ट्वीट शेअर करत लिहिले, ‘हा व्हिडीओ खोटा असून तुम्हाला फसवण्यासाठी बनवला आहे. तंत्रज्ञानाचा गैरवापर करण्याचा हा प्रकार पूर्णपणे चुकीचा आहे. तुम्हा सर्वांना विनंती आहे की, जर तुम्हाला असे व्हिडीओ किंवा अॅप्स किंवा जाहिराती दिसल्या तर लगेच कळवा.’
वाचा : ‘ठाकरेंनी लोकसभेचं खातं उघडून दाखवावं’, गिरीश महाजनांचं थेट चॅलेंज
सचिनने सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला अशा व्हिडिओंवर कारवाई करण्याचे आवाहन केले. त्याने पुढे लिहिले की, ‘सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने देखील सावधगिरी बाळगली पाहिजे आणि त्यांच्याविरुद्ध केलेल्या तक्रारींवर लवकरात लवकर कारवाई केली पाहिजे. या संदर्भात त्यांची भूमिका खूप महत्त्वाची आहे जेणेकरून चुकीची माहिती आणि बातम्यांना आळा बसेल आणि डीपफेकचा गैरवापर थांबवता येईल.’
त्याने आपल्या पोस्टमध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालय, केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर आणि महाराष्ट्र सायबर क्राइम यांनाही टॅग केले. डीपफेक, ‘डीप लर्निंग’ आणि ‘फेक’ चे पोर्टमँटो, एआय वापरून तयार केलेले हायपर-रिअलिस्टिक व्हिडीओ किंवा ऑडिओ रेकॉर्डिंग आहेत. ही बनावट माध्यमे व्यक्तींना त्यांनी कधीही न केलेल्या गोष्टी सांगत किंवा करत असल्याचे चित्रित करू शकतात, ज्यामुळे असंख्य नैतिक आणि सामाजिक चिंता वाढतात.
ADVERTISEMENT