पिंपरी-चिंचवड: आपल्या विधानाने नेहमी वाद निर्माण करणाऱ्या संभाजी भिडे यांनी आता पातळी सोडून वाद निर्माण करणारं वक्तव्य केल्याचं समोर आलं आहे. भारताच्या स्वातंत्र्य दिनाबाबत, झेंड्याबाबत आणि राष्ट्रगीताबाबत वादग्रस्त विधान संभाजी भिडेंनी पिंपरी-चिंचवडमधील एका कार्यक्रमात केलं आहे. आता त्यांच्या याच विधानावरुन त्यांच्यावर शिंदे सरकार कारवाई करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. (sambhaji bhide controversial statement independence day national flag national anthem congress speech video pimpri chinchwad latest news today maharashtra)
ADVERTISEMENT
मात्र, याआधी आपण जाणून घेऊयात संभाजी भिडे नेमकं काय म्हणाले. वाचा त्यांचं पिंपरी-चिंचवडमधील भाषण.
संभाजी भिडेंचं ‘ते’ वादग्रस्त भाषण जसंच्या तसं…
‘आपण तिरंगी झेंडाच पत्करला पाहिजे. या समितीचा निर्णय यायच्या आधीच त्यांच्या टकुरीत काय आहे ते त्यांनी सांगून टाकलं. ऑल इंडिया काँग्रेस कमिटीमध्ये म्हणजे ऑल इंडिया &%$ कमिटीमध्ये तिरंगी झेंडा पत्करला गेला. बसा बोंबलत.. का गेला? ज्या स्वातंत्र्यासाठी लक्षावधी पोरांनी फासावर लटकवून घेतलं आणि वंदे मातरम् म्हटलं.. ते गीतही तुमचं-आमचं राष्ट्रगीत नाही.’
‘जन-गण-मन अधिनायक जय हे.. भारत भाग्यविधाता.. पंचम जॉर्ज भ$ म्हणजे ब्रिटीश साम्राज्याचा राजा जो आमच्या देशात आला 1898 साली त्याच्या स्वागतासाठी रवींद्रनाथ टागोरांना सुचलेलं गीत.. काय लायकीचा देश, काय लायकीचे लोक.. काय लायकीचं स्वातंत्र्य.. आणि काय झेंडावंदन..’
‘उशीर झाला.. पण शिवबाने सांगावा धाडलाय रं.. याच्यावर ठाम निर्धाराने आपण सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे. या वर्षीपासून 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिन मान्य… कसं का असेना.. हांडगं स्वातंत्र्य असेल पण ते पत्करलं पाहिजे. आपण शिवाजी महाराजांना मानणारे आहोत. आपण काय बुळगे नाहीत. ए सगळं दुरूस्त करू.. बदलेली गणितं सगळी दुरूस्त करून टाकू.’
‘यावर्षी पासून नऊच्या ठोक्याला भगवा झेंडा घेऊन गावाबरोबर गाढव खावं लागतं या हिशोबाने तिरंगी झेंडा… तो काही तीन आणि चार मीटरचा नको. उगं काय दखलपात्र असावं म्हणून.. आणि त्याची गीतं ठरवलीत पाच-सात.. त्याची पुस्तकंही छापली. ती गीतं गावोगावी द्या.. शिकवा. ती गीतं म्हणतच.. हिंदवी स्वराज्य स्वातंत्र्य दिन पदयात्रा काढून.. स्वातंत्र्य दिन साजरा करायचा..’
‘त्या दिवशी कडकडीत उपवास करायचा.. आमच्या मातृभूमीचे तुकडे झाले म्हणून रात्री.. शिवछत्रपती संभाजी महाराज, भगवा झेंडा यांना नैवेद्य दाखवून असेल तरी भाकरी खायची. जोपर्यंत 15 ऑगस्ट साजरा करतोय तोपर्यंत करायचं.’
‘ज्या दिवशी लाल किल्ल्यावर फडवला झेंडा.. जोपर्यंत संपूर्ण देशावर हिंदवी स्वराज्य येत नाही तोपर्यंत आमचा स्वातंत्र्यदिन दु:खाचाही आहे. हे लक्षात घेऊन कडकडीत उपवास करायचा. मी आतापर्यंत बोलतो.. आमची स्वातंत्र्य लक्ष्मी जनानखान्यात जोधाबाईसारखी बटकी म्हणून जगणार नाही.. मान्य नाही..’
हे ही वाचा >> Sambhaji Bhide: ‘काळा दिवस, बटीक.. काय लायकीचं स्वातंत्र्य..’, संभाजी भिडे पुन्हा बरळले
‘ती सीतेसारखी प्रतिव्रता असणार.. पण परपुरुषाचा स्पर्श सहन होणार नाही. भगवा म्हणजे भगवाच.. हा निर्णय ज्यांना योग्य वाटतोय.. त्यांनी.. लकवा झालेला नाही तुम्हा कोणाला.. हात ताठ वर करा.. डावा नाही उजवा.’
‘हे करेल तर फक्त महाराष्ट्र करेल. ती पुण्याई जिजामाता, शहाजीराजे.. यांच्या प्रवाहातील पुण्याई आहे. अन्य राज्यात हा विचार रुजायला वेळ लागेल. पण आज नाही उद्या.. उभा महाराष्ट्र व्यापून आपण संबंध देशात जायचंय लक्षात ठेवा..’
‘दिल्लीवर भगव्या झेंड्याचंच राज्य पाहिजे. इतकंच नाही शिवाजी-संभाजी रक्ताचा आमचा सरसेनापती पाहिजे.. सरन्यायाधीश पाहिजे, पंतप्रधान पाहिजे, राष्ट्रपती पाहिजे. याची अत्यंत आवश्यकता आहे. त्याशिवाय आमच्या स्वातंत्र्याला पूर्णत्व नाही. आमचा लढा 15 व्या वर्षी शपथ घेतल्यापासून स्वातंत्र्यासाठी सुरू झाला आहे. शिवछत्रपतींनी तो सुरू केला आहे. त्याचं पूर्णत्व म्हणजे आमचं स्वातंत्र्य.’
’15 ऑगस्टला मिळालेलं स्वातंत्र्य ते आमच्या स्वातंत्र्याचं पूर्णत्व नाही. पाकिस्तान आणि बांगलादेश, इस्लामी राज्य आमच्या देशाच्या पाठीवरती असूच शकत नाही. जमत नाही..’
हे ही वाचा >> Crime: भयंकर… चाकू हातात घेत मित्राचा पाठलाग, हत्येचं कारण काय?
‘जयंती करू नका.. शिवाजी महाराज, संभाजी महाराज आपण जगूया.. त्यांच्यासारखं जगून त्यांनी जे स्वातंत्र्य पुकारलं होतं. ते स्वातंत्र्य पूर्ण झाल्यानंतरच उपवास करणं बंद करू. हा माझा विचार ज्यांना पटतो त्यांनी हात वर करा. लागूया कामाला..’
‘आई तुळजा भवानी आपल्याला 100 टक्के यश देणार.. फक्त आवश्यकता आहे.. अढळ श्रद्धा ठेवूया.. सूर्याला अंधार भेटत नाही.. आपल्याला अपयश भेटणार नाही. पक्कं लक्षात ठेवा..’ असं वादग्रस्त भाषण संभाजी भिडे यांनी केलं आहे.
ADVERTISEMENT