Chandrapur : अरेच्चा हा काय घोळ! जिगलच्या ‘आधार’ कार्डवर दिसताहेत देवेंद्र फडणवीस

मुंबई तक

22 Jun 2023 (अपडेटेड: 22 Jun 2023, 01:46 PM)

एका सात वर्षाच्या मुलाच्या आधारकार्डवर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो झळकल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे आता चंद्रपुर जिल्ह्यात या आधारकार्डची चर्चा रंगली आहे.

seven years old boy aadhar card and devendra fadnavis photo publish in aadhar chandrapur story

seven years old boy aadhar card and devendra fadnavis photo publish in aadhar chandrapur story

follow google news

देशासह राज्यातील प्रत्येक नागरीकांना आधारसक्तीचे आहे.प्रत्येक वयोगटातील व्यक्ती असो मग तो लहान असो किंवा मोठा असो, या सर्वांना आधारसक्तीचे करण्यात आली आहे. असे असतानाच आता एका सात वर्षाच्या मुलाच्या आधारकार्डवर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो झळकल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे आता चंद्रपुर जिल्ह्यात या आधारकार्डची चर्चा रंगली आहे. (seven years old boy aadhar card and devendra fadnavis photo publish in aadhar chandrapur story)

हे वाचलं का?

सिंदेवाही तालुक्यातील विरव्हा येथील रहिवासी असलेल्या वनमाला सावसाकडे या आईने सात वर्षांपूर्वी जिगल जीवन सावसा या मुलाचे आधारकार्ड काढले होते. मात्र या आधारकार्डवर मुलाचा फोटो छापून येण्याऐवजी तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो छापून आला होता. घरी आधारकार्ड आल्यावर वनमाला यांना ही चुक कळून आली होती. मात्र आधारकार्ड अपडेट करण्याच्या घोळ इतका होता की त्यांना सलग सात वर्ष याची वाट पाहावी लागली होती. जिगल सावसा साधारण 7 वर्ष देवेंद्र फडणवीसांच्या फोटोच्या आधारकार्डवर शाळेत प्रवेश घेत होता व इतर कामे करत होता.

हे ही वाचा :  पर्यटकांसमोर नाचवल्या वसतिगृहातील मुली, नाशिकमधला धक्कादायक प्रकार

जिगल जीवन सावसाकडे याचा जन्म आजोळी चिमूर तालुक्यातील शंकरपूर येथे 2015 रोजी झाला. त्याच्या आईचे माहेर शंकरपूरजवळील शिवरा येथील आहे. दरम्यान, शंकरपूर येथे आधार कार्ड काढण्यासाठी शिबिर आयोजित करण्यात आले होते.या शिबिरामध्ये जिगलचे आधार कार्ड काढण्यात आले होते. काही दिवसांनंतर जेव्हा आधार कार्ड घरी आले, तेव्हा मात्र कुटुबियांना आश्चर्याचा धक्का बसला. चिमुकल्याच्या आधारकार्डवर फोटोच्या जागी चक्क तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो होता.

दरम्यान जिगलच्या आईने आधार कार्डवरील फोटो बदलण्याचा प्रयत्न केला होता. मात्र ‘शासकीय काम आणि सहा महिने थांब’ या उक्तीप्रमाणे त्या आधार कार्डवर आज ही देवेंद्र फडणवीस यांचा फोटो लागला आहे. त्यामुळे सलग 7 वर्ष जिगल देवेंद्र फडवीसांचा फोटो लागलेल्या आधारकार्डसह वावरत आहे. याच आधारकार्डद्वारे त्याने शाळेत प्रवेश केला होता, अशी माहिती देखील आहे.

आता पाच वर्षांनंतर मुलाचे आधार कार्ड अपडेट करावे लागते अशी माहिती जिगलच्या आईला मिळाळी होती. त्यानुसार त्यांनी आधार कार्ड अपडेट करण्यासाठी पुन्हा प्रयत्न सुरु केले होते. यासाठी मुलाच्या जन्म दाखल्यासाठी शंकरपूर ग्रामपंचायतीकडे अर्ज केला आहे. या दरम्यान हे आधारकार्ड समोर आले होते. आता या आधारकार्डची जिल्ह्यात चर्चा रंगली आहे.

    follow whatsapp