Barsu: ‘लोकांनी झिडकारलेल्या ‘टिल्ल्या-पिल्ल्यां’नी…’, ठाकरेंनी पुन्हा राणेंना डिवचलं

मुंबई तक

• 04:10 AM • 06 May 2023

Uddhav Thackeray: शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज (6 मे) बारसूच्या दौऱ्यावर असून त्याआधी त्यांनी राणे पिता-पुत्रांवर सामनाच्या अग्रलेखातून बरीच टीका केली आहे.

shiv sena ubt chief uddhav thackeray has criticized narayan rane before the sarsu visit saamana editorial

shiv sena ubt chief uddhav thackeray has criticized narayan rane before the sarsu visit saamana editorial

follow google news

मुंबई: शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे बारसूला (Barsu) जाणार असून तेथील रिफायनरीला विरोध करणाऱ्या स्थानिकांची ते भेट घेणार आहेत. पण त्यांच्या याच भेटीबाबत भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी (Narayan Rane) त्यांना बारसूत येऊन दाखवण्याचं आव्हान दिलं होतं. असं असताना ‘सामना’च्या अग्रलेखातून ठाकरेंनी देखील राणे पिता-पुत्रांना टिल्ल्या-पिल्ल्या असं म्हणत डिवचलं आहे. (shiv sena ubt chief uddhav thackeray has criticized narayan rane before the sarsu visit saamana editorial)

हे वाचलं का?

‘लोकशाहीत पोलीस लोकांची डोकी फोडत असताना उद्धव ठाकरे यांनी तेथे पोहोचू नये, त्यांच्या मार्गात अडथळे आणावेत यासाठी उपऱ्यांचे राजकीय दलाल प्रयत्नशील आहेत. उद्धव ठाकरे बारसूत जात आहेत म्हणून कोकणातील काही आंडूपांडूंनी आव्हानाच्या पिचक्या बेडक्या फुगवल्यात. ‘कोकणात पाय ठेवून दाखवा, इंगा दाखवतो’ वगैरे नेहमीच्या वल्गना केल्या.’ असं म्हणत एक प्रकारे राणेंवर निशाणा साधण्यात आला आहे.

    follow whatsapp