Eknath Shinde Supporters beaten congress leader in thane : ठाण्यातील काँग्रेसचे प्रवक्ते गिरीश कोळी यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी थेट मुख्यमंत्री शिंदेंना लक्ष्य केलं.
ADVERTISEMENT
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा आरोप करत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ठाण्यातील काँग्रेसचे प्रवक्ते गिरीश कोळी यांना मारहाण केली. शिवसेना कोपरी उपविभाग प्रमुख बंटी बाडकर यांच्यासह इतर शिवसैनिकांनी गिरीश कोळी यांना मारहाण केली.
हेही वाचा – ‘माझ्यावर ठाकरेंचं प्रचंड ओझंय’, आव्हाडांनी सांगितला ‘तो’ इंटरेस्टिंग किस्सा
“मी तुला किती वेळा सांगितलं”
गिरीश कोळी यांना शिवसैनिकांनी मारहाण करताना केली. “तू का पोस्ट टाकली? तू भाईंबद्दल का बोलतो? का पोस्ट टाकतो? मी तुला किती वेळा सांगितलं की, तू साहेबांबद्दल बोलायचं नाही. तू का बोलतो साहेबांबद्दल? तू चैत्र नवरात्र करतो, तर किती जणांना खायला घालतो? तुला मी किती वेळा समजावलं? तुला काँग्रेसने पदावरून काढलं ना? तू आधी पोस्ट डिलीट कर. तू परत साहेबांबद्दल काही टाकलं तर लक्षात ठेव. तू साहेबांची जाहीर माफी माग नाहीतर मी तुला लय चोपेन”, असं म्हणत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कोळी यांना मारहाण केली.
जितेंद्र आव्हाडांचं ट्विट, एकनाथ शिंदेंवर टीका
ठाण्यातील या घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्हिडीओ टविट केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना आव्हाडांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे.
हेही वाचा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जितेंद्र आव्हाडांवर बरसले, विधानसभेत दाखवला फोटो
जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं आहे की, “महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब ह्यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट करणारा काँग्रेस ठाणे प्रवक्ता गिरीश कोळी ह्याला शिवसेना कोपरी उपविभागप्रमुख बंटी बाडकर व त्यांचे सहकारी शिवसैनिक ह्यांनी चोप दिला तसेच ती आक्षेपार्ह पोस्ट डिलीट करण्यात आली व माफी मागितली.”
“हे इतर कुठल्या पक्षाच्या नेत्यासाठी कार्यकर्त्यांनी केले, तर ते गुंड; मग पोलीस छळणार. स्वतः मुख्यमंत्री त्यात हस्तक्षेप करणार, जेलमध्ये सडवणार. हे सगळे मी गेले तीन वर्ष अनुभवतो आहे आणि मागचे ३५ दिवस तर सगळ्या मर्यादा पार”, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
ADVERTISEMENT