Manoj Jarange : जरांगेंशी बोलताना तरूणाच्या आईच्या डोळ्यात अश्रुंच्या धारा

रोहिणी ठोंबरे

• 05:29 PM • 05 Mar 2024

Manoj Jarange Patil : मराठा समाजाला (Maratha Reservation) ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) पुन्हा एकदा राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांचा दौरा करत आहेत. अशावेळी आज ते आज बीड (Beed) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. 

Mumbaitak
follow google news

Beed : Manoj Jarange Patil : मराठा समाजाला (Maratha Reservation) ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) पुन्हा एकदा राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांचा दौरा करत आहेत. अशावेळी आज ते आज बीड (Beed) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. 

हे वाचलं का?


बीड जिल्ह्यातील गवळवाडी येथे त्यांनी अखंड हरिनाम सप्ताहात भेट देऊन, त्यांनी मराठा समाज बंधवांशी देखील सवांद साधला. यावेळी नारायण गडचे महंत शिवाजी महाराज हे देखील याठिकाणी उपस्थित होते. 

आत्महत्या केलेल्या तरुणाच्या कुटुंबीयांची जरांगेंनी घेतली भेट!

मराठा आरक्षण प्रश्नावर बीड तालुक्यातील गवळवाडी येथील 20 वर्षीय धीरज मस्के या तरुणाने आत्महत्या केल्याची घटना दोन दिवसापूर्वी घडली होती. यावेळी दु:खाचा डोंगर कोसळलेल्या तरूणाच्या कुटुंबाला मनोज जरांगे पाटील यांनी भेट दिली. 

यावेळी कुटुंबाचे सांत्वन करत मराठा समाजाला आत्महत्या न करण्याचे आवाहन जरांगे पाटलांनी केले. हा लढा अंतिम टप्प्यात आला आहे मग तरुणच आत्महत्या करत असतील तर आरक्षणाचा काय उपयोग असंही मनोज जरांगे पाटील बोलले. 

'मला अटक होऊ शकते..', जरांगेंनी केला मोठा दावा

यावेळी जरांगे पाटलांनी पत्रकार परिषद घेतली. 'न टिकणारं दहा टक्के आरक्षण मराठ्यांना देण्यात आलं आहे. त्यासाठी आमच्यावर गुन्हे दाखल करणं सुरू आहेत. सरकारने आमची फसवणूक केली. सत्तेत मी काटा आहे, मला कधीही अटक होण्याची शक्यता आहे. तसा अहवाल तयार झाला असल्याचे” असं जरांगे पाटील पक्षकार परिषदेत म्हणाले.

    follow whatsapp