Pankaja Munde : भाजप नेता आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांना मोठा धक्का बसला आहे. परळी येथील वैद्यनाथ सहकारी कारखान्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाने कारखान्याची 19 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.
ADVERTISEMENT
वैद्यनाथ सहकारी कारखान्यावर कारवाई केल्यामुळे पंकजा मुंडे यांना मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान पंकजा मुंडे यांच्या शिवशक्ती परिक्रमा यात्रेनंतर ही कारवाई झाल्याने चर्चा होत आहे.
काय आहे प्रकरण?
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या परळी येथील वैद्यनाथ सहकारी कारखान्यावर केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाने 6 महिन्यांपूर्वी धाड टाकून काही कागदपत्रे तपासली होती. यामध्ये या कारखान्याने 19 कोटी रुपयांचा बेकायदेशीर जीएसटी कर बुडवल्याचे स्पष्ट झाले.
हेही वाचा >> ‘पत्रकारांना ढाब्यावर न्या’, चंद्रशेखर बावनकुळे काय बोलले? कारणही सांगितलं
रविवारी (२४ सप्टेंबर) छत्रपती संभाजीनगर येथील जीएसटी आयुक्तालयाने या कारखान्याची 19 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. या कारखान्याच्या चेअरमन पंकजा मुंडे आहेत.
हेही वाचा >> NCP Election Commission : ‘तो’ प्रश्न अन् अजित पवार चिडले, पुण्यात काय घडलं?
केंद्रीय जीएसटी आयुक्त कार्यालयाच्या पथकाने वारंवार वैद्यनाथ कारखान्याला जीएसटी कराबाबत नोटीसा दिल्या होत्या. या नोटिशीला प्रत्युत्तर न दिल्याने गेल्या सहा महिन्यांपूर्वी काही अधिकाऱ्यांनी या कारखान्याला अचानक भेट देत काही कागदपत्रे हस्तगत केली होती.
मालमत्ता विकणार…
या कारखान्याने बेकायदेशीररित्या 19 कोटींचा जीएसटी कर बुडवल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलीस बंदोबस्तात कारखान्याचे बॉयलर हाऊस आणि इतर मशिनरी असे मिळून 19 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. या मालत्तेचा लिलाव करून हा कर वसूल करण्यात येणार असल्याचे समजते.
ADVERTISEMENT