Viral Video : प्रियकराची हद्दच! चालू मॅचमध्येच थेट ग्राऊंडमध्ये घुसला अन् प्रेयसीला केलं प्रपोज

मुंबई तक

23 Apr 2023 (अपडेटेड: 23 Apr 2023, 09:43 AM)

प्रियकारने थेट सुरक्षा तोडून मॅच चालू असतानाच ग्राऊंडवर जाऊन, गुडघ्यावर बसून प्रेयसीला प्रपोज केल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतं आहे

The video of the boyfriend breaking the security and proposing to his girlfriend by going to the ground while the match was going on

The video of the boyfriend breaking the security and proposing to his girlfriend by going to the ground while the match was going on

follow google news

आपण अनेकदा क्रिकेटच्या (Cricket) किंवा फुटबॉलच्या (Football) मॅचदरम्यान, स्टेडियमवर प्रेक्षकांमध्ये बसून मित्र किंवा मैत्रिणीला प्रपोज केल्याचं पाहिलं आहे. मात्र एका प्रियकारने प्रेयसीला प्रपोज करण्याचा विचित्र मार्ग शोधला आहे. प्रियकारने थेट सुरक्षा तोडून मॅच चालू असतानाच ग्राऊंडवर जाऊन, गुडघ्यावर बसून प्रेयसीला प्रपोज केल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतं आहे. जेव्हा हा सगळा प्रकार घडला तेव्हा ग्राऊंडवर बेसबॉलचा सामना सुरू होता आणि स्टेडियममध्ये हजारो प्रेक्षक उपस्थित होते. (The video of the boyfriend breaking the security and proposing to his girlfriend by going to the ground while the match was going on)

हे वाचलं का?

रिकार्डो जुआरेज नावाच्या व्यक्तीने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये जुआरेज अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथील डॉजर स्टेडियममध्ये त्याची गर्लफ्रेंड रमोना सावेद्राला प्रपोज करताना दिसत आहे.

व्हिडीओमध्ये आपण पाहु शकतो की स्टेडियममध्ये बेसबॉलचा अत्यंत उत्कंठावर्धक सामना सुरू आहे. या दरम्यान, जुआरेझ प्रेक्षकांमधून उठतो आणि सुरक्षा भेदून मैदानात घुसतो. तो मैदानाच्या मध्यभागी गुडघे टेकून खाली बसतो आणि अंगठी काढून मॅच पाहायला आलेल्या आपल्या मैत्रिणीला प्रपोज करू लागतो. तेव्हाच सुरक्षा रक्षक कारवाईत येतात आणि जुआरेजला पकडून ग्राऊंडवरुन पुन्हा बाहेर घेऊन जातात.

अन् अस्वलाला समोर पाहून बिबट्याही घाबरला… ताडोबातील थरारक Video!

काय म्हणाले युजर्स?

हा व्हिडिओ आतापर्यंत 1 कोटींहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. यावर लाखो लोकांनी रिअॅक्शनही दिल्या आहेत. एका युजरने गार्डला उद्देशून जुआरेझला एवढ्या जोरात ढकलून देऊ नये, असं सांगितलं आहे. तर कुणी हा खेळाडूंच्या सुरक्षेचा प्रश्न असल्याचं म्हणतं गार्डची कृती बरोबर असल्याचं सांगितलं आहे. एका यूजरने म्हटले – प्रपोजची कल्पना चांगली होती, परंतु पद्धत चुकीची होती. दुसऱ्या युजरने याला पब्लिसिटी स्टंट म्हटले आहे. तिसऱ्या यूजरने शाब्बास म्हणून जुआरेझच कौतुक केलं आहे.

Viral Video : वृद्धेचा व्हिडीओ पाहुन अर्थमंत्र्यांनी SBI ला झापलं, म्हणाल्या, “मानवतेनं वागा”

दरम्यान, मॅचनंतर, जुआरेजने गर्लफ्रेंड रमोनासोबत आणखी एक फोटो पोस्ट केला. त्यात त्यांनी सांगितले की एवढ्या कष्टाने केलेलं प्रपोज स्वीकारलं आहे. सध्या या दोघांच्या जोडीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.

    follow whatsapp