किरीट सोमय्यांनी आरोप केलेल्या 19 बंगले प्रकरणात अधिकारी ग्रामपंचायत सदस्यांविरुद्ध गुन्हा

मुंबई तक

24 Feb 2023 (अपडेटेड: 29 Mar 2023, 10:04 PM)

19 Bunglows Scam। Uddhav Thackeray। Kirit Somaiya। Revadanda : उद्धव ठाकरे यांच्या परिवाराच्या कथित 19 बंगला घोटाळा प्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 23 फेब्रुवारीला रात्री सात जणांविरोधात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. बनावट कागदपत्र तयार करून शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 19 बंगले असल्याचा आरोप किरीट […]

Mumbaitak
follow google news

19 Bunglows Scam। Uddhav Thackeray। Kirit Somaiya। Revadanda : उद्धव ठाकरे यांच्या परिवाराच्या कथित 19 बंगला घोटाळा प्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 23 फेब्रुवारीला रात्री सात जणांविरोधात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. बनावट कागदपत्र तयार करून शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 19 बंगले असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केलेला आहे.

हे वाचलं का?

उद्धव ठाकरे आणि रवींद्र वायकर यांनी कागदपत्रांमध्ये खाडाखोड करुन हे बंगले आपल्या नावावर करुन घेतल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता.

अधिकाऱ्यासह ग्रामपंचायत सदस्यांवर का करण्यात आला गुन्हा?

कोर्लई गावातील 19 बंगला कथित घोटाळा प्रकरणी ग्रामविकास अधिकारी, बीडीओवर गुन्हा दाखल झाला आहे. मुरुडच्या ग्रामविकास अधिकारी संगिता भांगरे यांनी कोर्लई ग्रामपंचायत अधिकाऱ्यांविरुद्ध फसवणूक, १९ बंगलोच्या रेकॉर्डमधे खाडाखोड करणे याबद्दल तक्रार दाखल केली.

Kirit Somaiya: उद्धव ठाकरेंनी आता त्यांच्या मुलाची काळजी घ्यावी, कारण लवकरच…

कोर्लई 19 बंगले : एफआयआरमध्ये कुणाची नावं?

या प्रकरणी 23 फेब्रुवारी रोजी रात्री रेवदंडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एफआयआर क्रमांक 26, IPC Sections 420, 465, 466, 468 आणि 34 नुसार हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यात कोर्लई ग्रामपंचायतीचे तत्कालिन ग्रामसेवक, सरपंच आणि सदस्यांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किरीट सोमय्यांचा उद्धव ठाकरेंवर आरोप काय?

ठाकरेंनी 19 बंगल्यांची माहिती लपवली आहे, असा किरीट सोमय्या यांचा दावा आहे. सोमय्यांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली होती. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर किरीट सोमय्या यांनी ‘उद्धव ठाकरेजी, हिसाब तो देना पडेगा’ म्हणत ट्विटवरून इशारा दिला आहे.

सुरेश दादा ते हसन मुश्रीफ व्हाया मातोश्री; Kirit Somaiya यांच्या आरोपसत्रांचा इतिहास

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे व मनीषा रवींद्र वायकर यांच्या नावे मुरूड तालुक्यातील कोर्लई येथे जमीन खरेदी केली होती. त्यावर १९ बंगले होते. याची नोंद रद्द करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना दबाव टाकून या कागदपत्रांमध्ये फेरफार करण्यात आल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता.

    follow whatsapp