बिल्डिंगच्या तिसऱ्या मजल्यावरील घरात घोडा, सोसायटीत तुफान राडा

प्रशांत गोमाणे

27 Feb 2024 (अपडेटेड: 27 Feb 2024, 10:22 PM)

सोसायटी म्हटलं की नियम व अटी आल्याच, या सर्व अटींचे पालन करून एखाद्या रहिवाशाला सोसायटीत राहता येते. मात्र या घटनेत सर्वच नियम धाब्यावर बसवून एका तरूणाने थेट घोडाच तिसऱ्या मजल्यावर नेल्याची घटना घडली आहे.

सोसायटी म्हटलं की नियम व अटी आल्याच, या सर्व अटींचे पालन करून एखाद्या रहिवाशाला सोसायटीत राहता येते. मात्र या घटनेत सर्वच नियम धाब्यावर बसवून एका तरूणाने थेट घोडाच तिसऱ्या मजल्यावर नेल्याची घटना घडली आहे.

viral news poland man tries to hide stolen huge horse in third floor apartment society resident shocking story

follow google news

सोसायटी म्हटलं की नियम व अटी आल्याच, या सर्व अटींचे पालन करून एखाद्या रहिवाशाला सोसायटीत राहता येते. मात्र या घटनेत सर्वच नियम धाब्यावर बसवून एका तरूणाने थेट घोडाच तिसऱ्या मजल्यावर नेल्याची घटना घडली आहे. तरूणाने हा घोडा इमारतीतच नेला नाही तर तो घरात देखीस ठेवला. हा संपूर्ण प्रकार उघड होताच, सोसायटीत मोठा गोंधळ उडाला होता. दरम्यान या तरूणाने घोड्याला घरात का नेलं? यामागचं कारण काय आहे? हे जाणून घेऊयात. (viral news poland man tries to hide stolen huge horse in third floor apartment society resident shocking story) 

हे वाचलं का?

पोलंडमध्ये ही घटना घडली आहे. पोलंडच्या 19 वर्षीय तरूणाने एका घोड्याला आपल्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर नेऊन घरात डांबून ठेवले होते. सोसायटीतील रहिवाशांना ही घटना कळताच त्यांनी या घटनेला जोरदार विरोध केला होता. त्यामुळे सोसायटीत एकच गदारोळ झाला होता.

हे ही वाचा : Lok Sabha : मविआच्या बैठकीनंतर राऊतांनी दिली सर्वात मोठी बातमी

या घटनेनंतर इमारतीतील एका व्यक्तीने याबाबतची तक्रार पोलिसांना दिली होती. मात्र पोलिसांना सुरूवातीला या तक्रारीवर विश्वासच बसला नाही. त्यांना वाटलं कुणीतरी मस्करी केली असेल. मात्र तरी देखील या घटनेची माहिती मिळवण्यासाठी काही पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी घटनास्थळावरील दृष्य पाहून त्यांना धक्काच बसला. 

पोलीस ज्यावेळेस घटनास्थळी पोहोचले त्यावेळेस एक तरूण घोड्याला इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर घेऊन जात होता. तरूणाच्या या कृतीला सोसायटीतील रहिवाशांनी जोरदार विरोध केला होता. 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या तरूणाने घोड्याला चोरून आणले होते. आणि या घोड्याला लपवण्यााठी तो इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या आपल्या घरात नेणार होता. पण तो या घोड्याला घरात कसा ठेवणार होता? असा पोलिसांना प्रश्न पडला होता. 

हे ही वाचा : विधानसभेत SIT ची घोषणा होताच जरांगेंची तात्काळ दिलगिरी?

दरम्यान पोलिसांनी या घटनेची चौकशी केल्यानंतर त्या तरूणाला आणि चोरी झालेल्या घोड्याला ताब्यात घेतले होते. या घोड्याची किंमत 38 हजार डॉलर म्हणजेच 3 लाख रूपये होती. पोलिसांनी या घोड्याला सुरक्षितपणे आता त्याच्या मालकाच्या स्वाधिन केले आहे. तसेच तरूणाला अटक केली आहे. आता या तरूणाला कोर्टात हजर करण्यात आल्यानंतर त्याला 5 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या घटनेचा तपास सूरू आहे.
 

    follow whatsapp