Sharad Pawar : तणावमुक्त राहण्यासाठी काय करतात पवार?

मुंबई तक

27 Jul 2024 (अपडेटेड: 27 Jul 2024, 09:02 PM)

Sharad Pawar News : मी त्याचा फारसा विचार करत नाही. आणि एखाद पुस्तक असेल तर वाचायला घेतो. आता मी सरहद गांधींच्यावरचं एक पुस्तक वाचतो आहे. याचा अस्वस्थतेशी काही मेळ बसतो असं काही नाही.

supriya sule on his marriage share emotional story sharad pawar cry  shiv sena pramukh  balasaheb thackeray

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे तणावातून कसे बाहेर पडतात?

follow google news

बातम्या हायलाइट

point

मी त्याचा फारसा विचार करत नाही.

point

एखाद पुस्तक असेल तर वाचायला घेतो.

point

मी सरहद गांधींच्यावरचं एक पुस्तक वाचतो आहे.

Sharad Pawar News : तणाव हा प्रत्येकालाच येतो, मात्र या तणावातून मार्ग कसा काढायचा, याचं उत्तर प्रत्येकाचं वेगवेगळ असू शकत. पण राजकारणातील चाणाक्य अर्थात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे तणावातून कसे बाहेर पडतात? आणि तणावातून बाहेर पडायला काय करतात? याबाबत शरद पवारांनी (Sharad Pawar) एका मुलाखतीत सविस्तर सांगितले आहे. (what did sharad pawar do to stay stress free supriya sule maharashtra politics) 

हे वाचलं का?

शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची एबीपी माझाच्या माझा महा कट्टावर  मुलाखत पार पडली आहे. या मुलाखतीत शरद पवार तणाव कसा दुर करतात? याबाबत त्यांनी सांगितले आहे. मी त्याचा फारसा विचार करत नाही. आणि एखाद पुस्तक असेल तर वाचायला घेतो. आता मी सरहद गांधींच्यावरचं एक पुस्तक वाचतो आहे. याचा अस्वस्थतेशी काही मेळ बसतो असं काही नाही.  पण अशी काही पुस्तकं शोधून ती वाचायची, असे शरद पवार सांगतात. 

हे ही वाचा : Video : क्रॉस वोटींगच्या प्रश्नावर जितेश अंतापूरकरांनी काढला पळ, नांदेडमध्ये काय घडलं?

शरद पवार पुढे म्हणाले, आठ दहा दिवसांपूर्वी एका गावात काही प्रकार झाला. आणि काही स्त्रियांना त्रास दिला गेला, मी अस्वस्थ होतो. पण माझ्या नजरेसमोर एक पुस्तक आलं रुक्मिणीबाई. त्या पहिल्या महिला डॉक्टर झाल्या होत्या हे खूप चांगल पुस्तक आहे. अशावेळेला तुमचे सगळे विषय निघून जातात,असे त्यानी सांगितले. 

मी दोन मंदिरात जातो. तसेच, त्यांनी पुढे बोलताना दोन मंदिरांची नावंही सांगितली. एक पंढरपूरला आणि एक बारामतीत. कन्हेरी म्हणून गाव आहे. तसेच, वडिलांपाठोपाठ श्रद्धेबाबत बोलताना सुप्रीया सुळेंनीही भाष्य केलं. माझी श्रद्धा आहे, पण अंधश्रद्धा नाही, असं सुप्रीया सुळे म्हणाल्या

बुद्धीबळावर बोलताना शरद पवार म्हणाले,  मी बुद्धीबळ फार चांगलं खेळतो असं नाही, वेळ मिळाला की खेळतो. उंट तिरका चालतो, राजकारणात उंट कोण हे लक्षात ठेवावं लागतं, अडीच घरं चालणारा घोडा आपल्या बाजूला कोण आहे हे लक्षात ठेवावं लागतं, असं शरद पवार म्हणाले. 

हे ही वाचा :Sharad Pawar : मराठा समाजाला 'ओबीसी'तून आरक्षण द्यायला हवं का? पवार म्हणाले...

सुप्रिया सुळेंनी सांगितला लग्नाचा किस्सा 

सुप्रिया सुळे यांनी सांगितले की, माझे लग्न जमवण्यात बाबांचा रोल झिरो होता. माझी आई आणि बाळासाहेब ठाकरे यांचा रोल जास्त होता. शरद पवारांनीही मोठ्या मनाने ही गोष्ट मान्य केली.  शरद पवार म्हणाले की, वस्तुतः माझी भूमिका शून्यच होती. माझ्या जवळच्या मित्रांनी सदानंद सुळे यांचे स्थळ सुचवले होते. बाळासाहेब ठाकरे असतील किंवा उद्योजक माधव आपटे असतील. माझ्या जावयाचे वडील व आपटे कदाचित एकमेकांचे चांगले मित्र होते. आमच्या मित्रांनी त्यांच्या मुलाचे स्थळ सूचवले. त्यानंतर सुप्रिया व सदानंद एकमेकांना भेटले. जवळचे लोक सूचवतील तोच माझा जावई होणार हे सूत्र माझे ठरले होते, असे ते म्हणाले.

    follow whatsapp