Rain News : राज्यातील वेगवेगळ्या भागात सध्या तुफान पाऊस सुरू असून, काही ठिकाणी पूरपरिस्थिती ओढवली आहे. काही जिल्ह्यात नद्यांच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाली असून, गावांचाही संपर्क तुटला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही पावसाचा जोर कायम असून, पावसात मोटारसायकलवरून फिरण्याचं धाडस तरुणाला चांगलंच महागात पडलं.
ADVERTISEMENT
मुसळधार पावसाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे. विशेषतः कुडाळामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात बरसला आहे. कुडाळ हायवे नजिकच्या नविन एसटी डेपो जवळील रस्त्यावर पाणी आले असतानाही ओरोस येथील एक तरुण रात्री उशिरा पाण्यातून वाट काढण्याचा प्रयत्न करत होता.
वाचा >> IrshalWadi Landslide : ‘माझे तर सगळेच मेले’, वन विभागामुळे इर्शाळवाडी गेली मृत्यूच्या जबड्यात!
मात्र, हा तरुण दुचाकी गाडी घेवून जात असताना तो पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत जावू लागला. कुणीतर गाडीसह पाण्यात अडकल्याचं आणि वाहून जात असल्याचं आजूबाजूला असणाऱ्या तरुणांना दिसलं.
वाचा >> Kalyan: नाल्यात वाहून गेलेल्या ‘त्या’ बाळाचं नेमकं काय झालं?, 24 तास उलटले तरीही…
कुडाळतील तरुणांनी धाडस दाखवत त्याला वाचवले आहेत. आपल्या मोटरसायकलने हा तरुण पाण्यातून मार्गक्रमण करत होता. मात्र पुराच्या पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने हा तरुण वाहून जाऊ लागला.
काळपवाडी येथील सागर काळप,निकेश काळप,शैलेश धुरी,शैलेश काळप,अर्जुन सावंत,महेंद्र नाईक या युवकांनी या वाहत जाणारा तरुणाकडे धाव घेत त्याला वाचवण्यात यश आले आहे.
वाचा >> NCP च्या 7 आमदारांनी सोडली शरद पवारांची साथ, अजित पवारांना पाठिंबा!
कुडाळात पावसाने हाहाकार माजवला असून कुडाळ नविन एसटी डेपो परिसरात मोठ्य प्रमाणात पाणी घुसल्याने वाहतूक टप्प झाली आहे.तर नागरिकांचे मोठे हाल होत असून प्रशासनाने घराबाहेर पडू नये असे आदेश दिले असतानाही अतिउत्साही तरुण अशी स्टंटबाजी करत असल्याचे पाहायला मिळत आहे.
ADVERTISEMENT