Shirdi Crime: शिर्डी: शिर्डीमध्ये अहमदनगर पोलिसांच्या विशेष पथकाने देह व्यापार सुरु असलेल्या सहा हॉटेलवर छापा मारून कारवाई केल्याचं वृत्त नुकतंच समोर आलं आहे. याप्रकरणी तब्बल 11 आरोपींना ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, शिर्डीसारख्या आध्यात्मिक शहरात अशाप्रकारची पोलीस कारवाई करण्यात आल्याने भाविक आणि नागरिकांमध्ये एकच खळबळ माजली आहे. (11 accused have been arrested for busting a sex racket by raiding a hotel in shirdi)
ADVERTISEMENT
नेमकी घटना काय?
काल (5 मे) रात्री शिर्डी शहरातील विविध 6 हॉटेल्स छापेमारी करण्यात आली. श्रीरामपूर विभागाचे dysp संदीप मिटके यांच्या नेतृत्वाखाली सहा वेगवेगळ्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे काल रात्री एकाच वेळी छापे टाकले व सहा विविध हॉटेलमधून एकूण 15 पीडितांची सुटका केली आणि 11 आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
विशेष पथकाचे प्रमुख dysp संदीप मिटके यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की, याप्रकरणी 11 आरोपींविरोधात हद्दपारीचे प्रस्ताव तयार करण्यात येतील. त्यामुळे त्यांना पुढील काळात शिर्डीत प्रवेश करता येणार नाही. तसेच ज्या हॉटेल्समध्ये देह व्यापार सुरू होता ती हॉटेल्स देखील सील करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवणार असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं आहे.
शिर्डी हादरलं! सख्ख्या भावानेच केली अल्पवयीन बहिणीची निर्घृण हत्या
दरम्यान, मागील काही दिवसांपासून शिर्डीत गुन्ह्यांचं प्रमाण हे वाढत चाललं आहे. तीन दिवसांपूर्वीच शिर्डीत सख्ख्या भावाने अल्पवयीन बहिणीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
हे ही वाचा >> हनी ट्रॅपमध्ये अडकला DRDO चा शास्त्रज्ञ, गुप्त माहिती पुरवल्याप्रकरणी पुण्यातून अटक
भावाने सिमेंटच्या पेव्हर ब्लॉक बहिणीच्या डोक्यावर व चेहऱ्यावर मारून तिची हत्या केली. या हत्येनंतर आरोपी भावाने पळ काढला होता.मात्र आरोपी भावाला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. दरम्यान या प्रकरणात पोलिस आरोपी भावाची चौकशी करतात. तसेच भावाने बहिणीची हत्या का केली? याचे कारण शोधले जात आहे.
भावाने सिमेंटच्या पेव्हर ब्लॉक बहिणीच्या डोक्यावर व चेहऱ्यावर मारून तिची हत्या केली. या हत्येनंतर आरोपी भावाने पळ काढला होता.मात्र आरोपी भावाला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. दरम्यान या प्रकरणात पोलिस आरोपी भावाची चौकशी करतात. तसेच भावाने बहिणीची हत्या का केली? याचे कारण शोधले जात आहे.
या भांडणातून श्रुत कुलथेने आपल्याच सख्या बहिणीच्या डोक्यात व तोंडावर पेव्हर ब्लॉक मारून तिची निघृण हत्या केली. या हत्याकांडानंतर आरोपी भाऊ श्रुत कुलथे फरार झाला होता. या घटनेनंतर कुटूंबियांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर पोलिस आरोपी भावाच्या मागावर होते.
हे ही वाचा >> सुनेचे दोन तरुणांसोबत सुरु होते शरीरसंबंध, सासूने दरवाजाला लावला टाळा अन्…
दरम्यान पोलीस तपासाच श्रुत कुलथे फरार झाल्याचे निष्पन्न झाले होते. मात्र येवला येथे आरोपी श्रुत कुलथे कपड्यावर रक्ताचे डाग असलेल्या अवस्थेत पोलीस निरीक्षक पाडूरंग पवार यांना सापडला होता. यावेळी पाडूरंग पवार यांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता, आरोपीने भावाने बहिणीची हत्या केल्याची कबुली दिली होती.
ADVERTISEMENT