Crime News : छत्तीसगडमधील (Chhatisgarh) खैरागड-छुईखदान-गंडई (KCG) येथून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे, जिथे एका 14 वर्षांच्या मुलीने आपल्या मोठ्या भावाची हत्या केल्याची माहिती मिळाली आहे. असे सांगितले जात आहे की, मृत मुलगा आपल्या बहिणीला फोनवर मुलांशी बोलत असल्याने ओरडला होता, त्यानंतर अल्पवयीन मुलीने रागाच्या भरात आपल्या भावाची हत्या केली. (18 years old brother scolded 14 years Sister for using mobile phone She cut his brother's throat with an ax)
ADVERTISEMENT
छुईखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अमलीडीहकला गावात घडलेल्या या घटनेत आरोपी मुलीला ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांनी शनिवारी (4 मे) सांगितले. मुलीने पोलिसांना सांगितले की, घटनेच्या वेळी ती आणि तिचा मृत भाऊ (18) घरी एकटेच होते, तर कुटुंबातील इतर सदस्य कामासाठी बाहेर गेले होते. यावेळी भावाने मुलांशी मोबाईलवर बोलत असल्याचा दावा करत यापुढे फोन वापरायचा नाही अशी ताकीद दिली.
हेही वाचा : Sumitra Mahajan : "लोक फोन करून सांगताहेत की, भाजपला नाही 'नोटा'ला मत देणार"
पोलिसांनी सांगितले की, रागाच्या भरात मुलीने तिच्या झोपलेल्या भावावर कुऱ्हाडीने वार केले आणि त्याच्या मानेवर वार केले, ज्यामुळे मुलाचा जागीच मृत्यू झाला. यानंतर मुलगी आंघोळीसाठी गेली आणि तिच्या कपड्यांवरील रक्ताचे डाग साफ केले, मात्र नंतर तिने शेजाऱ्यांना सांगितले की तिच्या भावाचा खून झाला आहे.
हेही वाचा : राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका, 'तेव्हा सत्तेचा बोळा कोंबला असतात तोंडात...'
यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या लोकांनी पोलिसांना माहिती दिली. पथकाने घटनास्थळी पोहोचून मुलीची चौकशी केली असता मुलीने आपला गुन्हा कबूल केला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
ADVERTISEMENT