Thane Crime News: मुरबाड: ठाणे जिल्ह्यातील मुरबाड (Murbad) तालुक्यातून अत्यंत धक्कादायक असं वृत्त नुकतंच समोर आलं आहे. एका जुन्या भांडणाच्या रागातून माजी सभापतीने तरुणाचे दोन्ही हात मुळापासून छाटून टाकल्याची अत्यंत भयकंर घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण पसरले आहे. (27 year old man hands were cut off by a former chairman of a panchayat samiti in murbad due to an old dispute)
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार मुरबाडमध्ये काल (15 डिसेंबर) संध्याकाळी मुरबाड बारवी धरण रस्त्यावर देवपे गावातील तरुण सुशील भोईर (वय 27 वर्ष) हा रिक्षाने जात असतानाच त्याच्यावर हा जीवघेणा हल्ला झाला.
नेमकं प्रकरण काय?
आरोपानुसार, मुरबाड पंचायत समितीचे माजी सभापती श्रीकांत धुमाळ आणि सुशील भोईर यांच्यात काही मुद्द्यांवरून जुना वाद होता. याच गोष्टीचा राग श्रीकांत धुमाळ यांच्या मनात होता. त्याचाच बदला घेण्यासाठी त्यांनी कट रचून सुशील भोईर याच्यावर हल्ला चढवला.
सुशील भोईर याच्यावर पाळत ठेवून त्याच्यावर धुमाळ यांनी जीवघेणा हल्ला केला. सुशील हा रिक्षाने येत असल्याचे पाहताच बारवी धरण परिसरातील निर्जनस्थळी धुमाळ यांनी आपल्या साथीदारांसह कारने सुशीलची रिक्षा अडवली.
हे ही वाचा>> Gadchiroli Crime News: काळ्या जादूची भीती, पोटाच्या मुलाने आई-बापाला का ठेचून मारलं?
यानंतर त्यांनी सुशीलला बाहेर काढून मुरबाडच्या जंगलात नेलं यावेळी त्यांनी सुशीलवर तलवारीने सपासप वार केले. एवढंच नव्हे तर त्याचे दोन्ही हातच त्यांनी यावेळी छाटून टाकले. त्यानंतर त्याला त्याच अवस्थेत सोडून मारेकऱ्यांनी तिथून पळ काढला.
सुशील त्याच अवस्थेत तिथे आढळून आला. यावेळी त्याचे छाटलेले हात आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. सुदैवाने या जीवघेणा हल्ल्यानंतरही सुशील हा बचावला आहे. दरम्यान, त्याच्यावर हल्ला झाल्यानंतरचे काही फोटो आणि व्हीडिओ हे आता समोर आले आहेत. ज्यानंतर यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. तसेच मुरबाड तालुक्यातही तणावाचं वातावरण आहे.
हे ही वाचा>> Thane: MSRDC च्या संचालकाच्या मुलाचं भयंकर कृत्य, गर्लफ्रेंडला कारने चिरडल्याचा आरोप
दरम्यान, याप्रकरणी श्रीकांत धुमाळ याच्यासह त्याचा मेहुणा अंकुश खारीक, नितीन धुमाळ व इतरांवर मुरबाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या हल्ल्यानंतर आरोपी फरार झाले आहेत. गुन्हा दाखल झाल्यापासून मुरबाड पोलीस आरोपींचा कसून शोध घेत आहेत. मात्र, अद्यापही आरोपींचा शोध लागलेला नाही. त्यामुळे आता लवकरात लवकर आरोपींना पकडण्याचं आव्हान पोलिसांसमोर असणार आहे.
ADVERTISEMENT