Crime news : 30 वर्षीय तरुणीची हत्या करून मृतदेह फेकला अंबोली घाटात, कारण…

सिंधुदुर्ग न्यूज : म्हापसा पोलीस ठाणे हद्दीतील परवली गावात राहणाऱ्या तरुणीची हत्या करण्यात आली. कामाक्षी असे मृत तरुणीचे नाव असून, ती 30 वर्षांची होती.

The girl's ex-boyfriend is suspected of murder. Such an allegation has been made by the girl's family. The name of the suspect is Prakash Chunchwad (age 22).

The girl's ex-boyfriend is suspected of murder. Such an allegation has been made by the girl's family. The name of the suspect is Prakash Chunchwad (age 22).

भागवत हिरेकर

01 Sep 2023 (अपडेटेड: 01 Sep 2023, 03:11 PM)

follow google news

Sindhudurg crime news : एका 30 वर्षीय तरुणीची हत्या करून मृतदेह अंबोली घाटात फेकल्याची धक्कादायक घटना समोर आलीये. मृत तरुणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परवली गावातील असून, तिच्या एक्स बॉयफ्रेंडने हत्या केल्याचा आरोप आहे.

हे वाचलं का?

परवली गावातील कामाक्षी नावाच्या तरुणीची हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. ती 30 वर्षांची असून, कुटुंबासोबत राहत होती. म्हापसा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. एक्स बॉयफ्रेंडनेच तिची हत्या केल्याचा संशय आहे. फॉरेन्सिक सायन्स टीमने घटनास्थळाची तपासणी केली असून, कामाक्षीच्या मृतदेहाचीही तपासणी या टीमकडून करण्यात आलीये.

तरुणीची हत्या… सगळं प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार तरुणीच्या एक्स बॉयफ्रेंडवरच पोलिसांना संशय आहे. तिच्या कुटुंबीयांनीही त्याच्यावर आरोप केले आहेत. संशयित आरोपीचं म्हणजे कामाक्षीच्या एक्स बॉयफ्रेंडचं नाव प्रकाश चुंचवाड आहे. तो 22 वर्षांचा आहे. परवली मध्ये त्याचे गॅरेज आहे.

हेही वाचा >> Sudhir More : ठाकरे गटाच्या नेत्याचा संशयास्पद मृत्यू; मृतदेहाचे झाले अनेक तुकडे

प्रकाश चुंचवाड आणि कामाक्षीचे प्रेमसंबंध होते. पण, दोघांचं ब्रेकअप झालं. त्यानंतरही प्रकाश कामाक्षीला त्रास देत होता. त्यावरून दोघांमध्ये सातत्याने वाद होत होते, अशीही माहिती समोर आली आहे.

हेही वाचा >> Pune crime : जावयाचा प्रताप! सासूकडून 10 लाख उकळण्यासाठी स्वतःच्या मुलीचं…

हत्येच्या काही तास आधी पोलिसांत दिली होती तक्रार

कामाक्षीने प्रकाश सोबतचे नातेसंबंध तोडले होते. पण, प्रकाश संबंध कायम ठेवण्यासाठी त्रास देत होता, अशी माहिती समोर आलीये. त्यामुळेच प्रकाशने कामाक्षीची हत्या केली असावी, असा संशय पोलिसांना आहे. महत्त्वाचं म्हणजे मृत तरुणीने हत्या होण्याच्या काही तास आधी म्हापसा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

    follow whatsapp