Dharashiv Crime : चॉकलेटचं आमिष दाखवून चिमुकलीवर 42 वर्षाच्या व्यक्तीने.... राज्यात चाललंय तरी काय?

Dharashiv crime News: अल्पवयीन मुलींवरील बलात्काराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातअल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे.

Mumbai Tak

मुंबई तक

06 Mar 2025 (अपडेटेड: 06 Mar 2025, 12:49 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

शेतामध्ये मुलगी एकटी असताना आरोपीनं केलं कृत्य

point

चॉकलेटं आमिष दाखवून केले अत्याचार

point

वाशिमध्येही दोन अल्वपयीन मुलींवर अत्याचार

Dharashiv News : धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील शिराढोण पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका 4 वर्षाच्या मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. मुलगी शेतामध्ये लिंबाच्या झाडाखाली एकटी असताना 42 वर्षीय तरुणाने तिला चॉकलेटचं आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. 

हे वाचलं का?

देवधानोरा गावातील आरोपी संजय वेदपाठक याने लैंगिक अत्याचार केल्याची माहिती आहे  याप्रकरणी शिराढोण पोलिसात 64(2),65(2),137(2)सह पोस्को कलम 4,8,12 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असुन आरोपी वेदपठाक यास अटक करण्यात आली असून  पोलिस अधिक तपास करीत आहेत.

हे ही वाचा >> Abu Azmi निलंबित, पण राहुल सोलापूरकर, प्रशांत कोरटकर यांचं काय? राजकीय घडामोडींचा अर्थ काय?

काही दिवसांपूर्वी वाशिम जिल्ह्यात 24 तासात दोन अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना समोर आल्या आहेत. 26 फेब्रुवारी रोजी वाशिम शहरातील अकोला नाका संकुलातील एका किराणा दुकानात शेजारी राहणाऱ्या 7 वर्षीय मुलीवर बलात्काराचा प्रयत्न झाल्याची घटना उघडकीस आली आहे.  या संदर्भात पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वाशिम शहरातील अकोला नाका परिसरात राहणारी 7 वर्षांची निष्पाप मुलगी शेजारच्या किराणा दुकानात आईस्क्रीम घेण्यासाठी गेली होती. दुकानात उपस्थित असलेल्या 20 वर्षीय तरुणानं तिला सांगितलं की, त्याच्या दुकानात आईस्क्रीम नाही, पण शेजारच्या दुकानात ते मिळते. काही वेळाने 7 वर्षांची निष्पाप मुलगी एका किराणा दुकानासमोरून जात असताना, त्या तरुणाने तिला दुकानात बोलावलं आणि तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. 

हे ही वाचा >> Weather In Maharashtra : मुंबई शहर आणि उपनगरात उष्णतेच्या लाटा! 'या' ठिकाणी कसं आहे तापमान? वाचा सविस्तर

या घटनेला 24 तासही उलटले नव्हते, तेव्हा 27 फेब्रुवारीला रिसोड शहरात एका व्यक्तीनं 16 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या घटनेने खळबळ उडाली होती. पोलिस अधिकाऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी जिल्ह्यातील रिसोड शहरातील एका संस्थेसमोर उभी होती. तेव्हा काही वेळाने एक व्यक्ती तिच्याकडे आला आणि म्हणाला की, मी तुझ्या दोन्ही मामांचा मित्र आहे. असं म्हणत त्यानं पीडितेला तिच्या मामांची नावंही सांगितली आणि तिला सोबत घेऊन गेला आणि अत्याचार केला होता. 

    follow whatsapp