Jalna Crime : जालन्यामध्ये एका महिलेची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील अंतरवली टेंभी गावात ही घटना घडली. मीरा राजकुमार बोंदारे असे मृत महिलेचं नाव आहे. मयत महिला मीरा आपल्या शेतात शेतीच्या कामासाठी गेली होती. त्याचवेळी झाडाखाली विश्रांती घेत असताना अज्ञात व्यक्तीनं तिच्यावर दगडाने हल्ला केला. त्यामुळे 42 वर्षांच्या मीरा बोंडारे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Maharashtra Weather 27th March: मराठवाड्यात पाऊस पडणार, कसं आहे तुमच्या जिल्ह्याचं आजचं हवामान?
शेतात कामाला गेलेल्या मीरा यांचा चेहऱा दगडाने अत्यंत निघृणपणे ठेचण्यात आला. मीरा यांची हत्या कोणी आणि का केली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र, या घटनेची माहिती मिळताच तीर्थपुरी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून घटनेचा तपास सुरू केला. या घटनेमुळे अंतरवली टेंभी गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
हे ही वाचा >> Waghya Dog controversy: 'संभाजीराजे 100 टक्के चूक बोलले', संभाजी भिडे असं का म्हणाले.. काय आहे नेमका वाद?
लातूर जिल्ह्यातून अशीच एक हृदयद्रावक घटना समोर आली होती. शहराच्या बाहेरील एका दुकानाबाहेर एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता ज्याची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली होती. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृताचे वय अंदाजे 40 आहे. विवेकानंद चौक पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या रिंगरोड परिसरात त्यांची हत्या करण्यात आली होती. पोलिस निरीक्षक संतोष पाटील यांनी सांगितले की, प्राथमिक तपासात मध्यरात्री ते पहाटे पाचच्या दरम्यान खून झाला असावा. मृताच्या शरीरावर गंभीर जखमांच्या खुणा आढळल्या असून, यावरून त्याची निर्घृण हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. याप्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे.
ADVERTISEMENT
