देशभरात लग्नसराई सुरु आहे. लग्नाचे ढोल-नगाडे वाजतायत,वराती निघतायत.अनेक तरूण तरूणी लग्न बंधनात (Wedding) अडकतायत.असे सर्व वातावरण असताना लग्नाची एक गोष्ट समोर आली आहे. या लग्नात एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलीचे 45 वर्षाच्या व्यक्तीसोबत लग्न लावले जात होते. विशेष म्हणजे या लग्नाला मुलीच्या कुटुंबियांचीही मंजुरी होती. हे लग्न लागत असतानाच लग्नात पोलिसांची (Police) एन्ट्री झाली होती. त्यामुळे पोलिसांची एंन्ट्रीनंतर नेमके काय घडलेय़, हे जाणून घेऊय़ात. (45 year old groom and 12 year old bride police ation on child marriage)
ADVERTISEMENT
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना चाईल्ड हेल्पलाईन नंबर 1098 वरून एक तक्रार प्राप्त झाली होती. या तक्रारीत रेडमा परिसरातील ठाकुरबाडी मंदिरात 12 वर्षीय अल्पवयीन मुलीची 45 वर्षीय पुरुषासोबत लग्न लावले जात असल्याची माहिती देण्यात आली होती. या घटनेची माहिती मिळताच पोलीस (Police) तत्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांसोबत सीडब्ल्यूसी आणि चाइल्डलाइन टीम लग्नाच्या स्थळी पोहोचली होती.
हे ही वाचा : मोलकरीण.. हनीट्रॅप अन् डॉक्टर.. भयंकर घटनेचा कसा झाला पर्दाफाश?
लग्नात सर्व विधि सुरू असताना पोलिसांची (Police) एन्ट्री झाली होती. त्यामुळे पोलिसांच्या एन्ट्रीने एकच दहशतीचे वातावरण पसरले होते. पोलिसांनी लग्नात सूरूवातीला 45 वर्षीय नवऱ्याला अटक केली. तो पाटण भागातील कांकेकलाचा रहिवाशी आहे. त्यानंतर पोलिसांनी त्या 12 वर्षीय मुलीची आणि तिच्या कुटुंबियांची चौकशी केली. या चौकशीत या लग्नाला तिच्या कुटुंबियांचीच परवानगी होती, अशी धक्कादायक माहिती समोर आली. कोणत्याही दबावाखाली न जाता अल्पवयीन मुलीचे लग्न 45 वर्षीय तरूणासोबत लावलं जात असल्याची माहिती समोर आली होती.दरम्यान पोलिसांनी 45 वर्षीय नवरदेवाला ताब्यात घेतले आहे. तर मुलीला बालिका सुधारगृहात सोडले आहे. आता या प्रकरणात मुलीचे इतक्या लहान वयात लग्न का लावले जात होते. याचा पोलिस तपास करत आहेत.
लग्नात महिलेची चालाखी
मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) आगरा मालवामध्ये देखील अशीच घटना समोर आली होती. या घटनेत सुसनेर पोलिस (Police) ठाणे हद्दीतील मेहंदी गावात राहणारी एक महिला आपल्या अल्पवयीन मुलीचे जबरदस्तीने लग्न लावत होती. या लग्नाला तिच्या वडिलांचा विरोध होता, त्यामुळे त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.या तक्रारीत त्यांनी माझ्या मुलीचे जबरदस्ती लग्न लावल्याचा गंभीर आरोप केला होता. या तक्रारीनंतर पोलिस लग्नस्थळी दाखल झाले होते. या दरम्यान महिलेने चलाखी दाखवून आपल्या मुलीला बाजूला करून स्वत:च लग्नमंडपात नवरी म्हणून उभी राहिली होती. पण महिलेची चलाखी पोलीसांसमोर चालली नाही.आणि पोलिसांनी महिला आणि तिच्या भावाला ताब्यात घेतले होते. या लग्नाची सोशल मीडियावर रंगली होती.
ADVERTISEMENT