Crime: डायबिटीज असतानाही सतत मिठाई खायची,वैतागून नवऱ्याने केली हत्या

प्रशांत गोमाणे

• 02:30 PM • 28 Aug 2023

मुंबईतून (Mumbai) एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. या घटनेत नवऱ्याने (Husband) चाकूने वार करून आजारी बायकोची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शकुंतला बालुर (76) असे मृत झालेल्या महिलेचे नाव आहे.

79 year old man killed her wife Consumed sweets continuously mumbai crime story

79 year old man killed her wife Consumed sweets continuously mumbai crime story

follow google news

मुंबईतून (Mumbai) एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. या घटनेत नवऱ्याने (Husband) चाकूने वार करून आजारी बायकोची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शकुंतला बालुर (76) असे मृत झालेल्या महिलेचे नाव आहे. या हत्येनंतर आरोपी विष्णुकांत बालुरने (79) आत्महत्या करून स्वत:ला देखील संपवण्याचा प्रयत्न केला होता.पण सुदैवाने त्यांचा जीव बचावला आहे.या घटनेने सध्या मुंबई हादरली आहे. (79 year old man killed her wife Consumed sweets continuously mumbai crime story)

हे वाचलं का?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, कांदिवली पूर्वेत विष्णुकात बालूर त्यांच्या बायकोसोबत राहत होते. या बालूर दाम्पत्याचा मुलगा अमेरिकेत राहत असल्याने हे दाम्पत्य एकटेच मुंबईत राहायचे. विष्णुकात बालूर आणि शकुंतला बालुर या दोघांनाही डायबिटीजचा आजार होता. हा आजार असताना देखील शकुंतला यांना मिठाई खाण्याची खूप सवयी होती. या सवयीला विष्णुकांत वैतागले होते.

घटनेच्या दिवशी शंकुतला यांनी मिठाई मागितली होती. त्यावेळी विष्णुकांत यांनी त्यांना मिठाई दिली. मात्र तरीही त्या आणखीण मिठाईचा आग्रह करत होत्या. याच आग्रहाला वैतागून विष्णुकांत यांनी शंकुतला यांना संपवले होते. विष्णुकांत यांनी शकुंतला यांच्यावर चाकूने अनेक वार करून त्याची हत्या केली होती. या हत्येनंतर विष्णुकांत यांनी स्वत: ला देखील संपवण्याचा प्रयत्न केला होता. या संपूर्ण घटनेनंतर दोन्हीही दाम्पत्य रक्त्याच्या थारोळ्यात घरात पडले होते.

हे ही वाचा : Crime : अनैतिक संबंधातून पतीचा काढला काटा, बायकोने प्रियकरासह मिळून रचला कट

दरम्यान ज्यावेळेस देखभाल करणारी अनिता राठोड त्यांच्या घऱी आली, त्यावेळेस ही घटना उघडकीस आली.अनिताने सुरक्षारक्षकाच्या मदतीने दरवाजा उघडला असता दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली होती. पोलिसांनी तत्काळ दाखल होऊन दोघांना रूग्णालयात दाखल केले होते. यावेळी डॉक्टरांनी शकुंतला यांना मृत घोषित केले, तर विष्णुकांत हे बचावले होते. त्यांच्यावर उपचार सुरु होते.

पोलिसांनी या प्रकरणात आता विष्णुकांत याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पण अद्याप त्यांना अटक केली आहे. सध्या आरोपी विष्णुकांत यांच्यावर उपचार सुरु आहे.तसेच विष्णुकांत यांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य पाहूनच त्याच्या अटकेसंदर्भात निर्णय़ घेणार असल्याचे पोलिसांनी सांगितेल आहे. या घटनेचा अधिक तपास सुरु आहे.

    follow whatsapp