सातारा: मुलाच्या नावे बनावट इन्स्टाग्राम अकाउंट उघडून युवतीने मस्करी म्हणून मैत्रिणीला ‘फ्रेंड’ केलं. ही मैत्रीण या युवकाच्या प्रेमात पडली. मात्र, युवकाने आत्महत्या केल्याचे भासविल्याने मैत्रिणीने देखील गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार साताऱ्यात घडला आहे. ही घटना साताऱ्यातील वाठार पोलीस ठाण्याच्या हद्दीत (ता. कोरेगाव) उघड झाली आहे. (a girl sent a friend request as a boy a girl fell in love and then committed suicide a shocking incident in satara)
ADVERTISEMENT
नेमकी घटना काय?
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाठार स्टेशन परिसरातील एका गावातील 24 वर्षीय युवती आणि दुसऱ्या गावातील एक मुलगी मैत्रिणी होत्या. या युवतीने मस्करीपोटी मनीष या नावाने ‘इन्स्टाग्राम’वर बनावट खाते उघडले आणि आपल्या मैत्रिणीला ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ पाठवली.
हे ही वाचा>> Crime : पत्नीला आधीपासूनच होता मुलगा, सत्य समजताच नवऱ्याने दाखवलं खरं रूप!
मैत्रिणीने ती स्वीकारल्यामुळे बनावट अकाउंटद्वारे एकमेकांशी संवाद सुरू झाला. प्रेमात पडल्यानंतर मनीषला भेटण्यासाठी मैत्रीण आग्रह करू लागल्याने बनावट खाते तयार करणाऱ्या युवतीची पंचाईत झाली. भीतीपोटी तिने शिवम पाटील नावाने दुसरे बनावट खाते तयार केले. त्या माध्यमातून व मनीषच्या खात्यावरून शिवम पाटील यांनी संबंधित मुलीला आपण मनीषचा वडील असल्याचे सांगून तो मृत झाला असल्याचे ‘इन्स्टाग्राम’वरूनच सांगितले.
तसे दवाखान्यातील नकली फोटोही पाठवले. त्यामुळे या विरहातून 24 वर्षीय युवतीने 12 जूनला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची नोंद वाठार पोलीस ठाण्यात अकस्मात निधन म्हणून झाली होती. या सर्व प्रकारास कारणीभूत ठरलेल्या संशयित युवतीला आता पोलिसांनी अटक केली आहे.
सातारा सायबर पोलीस व सायबर तज्ज्ञ जय गायकवाड यांनी ‘इन्स्टाग्राम’वरून या संदर्भातील माहिती मागवली. त्यातूनच हा धक्कादायक प्रकार उघड झाला. या सर्व प्रकारास कारणीभूत ठरलेल्या संशयित युवतीला पोलिसांनी अटक केली.
हे ही वाचा>> Khalilur Rehman Qamar: महिलेने दिग्दर्शकाला रुममध्ये बोलावलं अन्... 'तो' अश्लील Video लीक
पोलीस अधीक्षक समीर शेख , अतिरिक्त पोलीस अधीक्षक आंचल दलाल, उपअधीक्षक सोनाली कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अविनाश माने, उपनिरीक्षक सातव, भोसले, पोलीस कर्मचारी चव्हाण, देशमुख , इथापे यांच्यासह सातारा ‘सायबर टीम’ने ही घटना उघडकीस आणली.
ADVERTISEMENT