महाराष्ट्रातल्या बारामतीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका शाळकरी मुलीसमोर तिच्या वडिलांना ठार मारण्यात आलं आहे. बारामतीतल्या शाळेत एका विद्यार्थिनीला घेण्यासाठी तिचे वडील आले होते. त्यावेळी तिच्या वडिलांची त्या शाळकरी मुलीच्या डोळ्यांदेखत हत्या करण्यात आली. या मुलीच्या वडिलांवर धारदार शस्त्राचे वार करण्यात आले. त्यानंतर हे अज्ञात हल्लेखोर येथून पळून गेले.
ADVERTISEMENT
प्रेमसंबंधातून काढला मुलीच्या वडिलांचा काटा; नागपुरातील द्विवेदी हत्या प्रकरणाचा असा झाला खुलासा
बारामतीतले हल्लेखोर अल्पवयीन?
बारामतीमध्ये घडलेल्या या घटनेतले हल्लेखोर अल्पवयीन असल्याची माहिती समोर येत आहे. शशिकांत कारंडे या व्यक्तीची हत्या त्याच्या शाळकरी मुलीच्या डोळयांदेखत करण्यात आली आहे. बारामतीतल्या श्रीराम नगर भागात संध्याकाळी ५.३० च्या दरम्यान ही धक्कादायक घटना घडली. शशिकांत कारंडे हे कविवर्या मोरोपंत हायस्कूलमधून आपल्या मुलीला घ्यायला गेले होते. ज्या अल्पवयीन मुलांनी शशिकांत कारंडे यांच्यावर हल्ला केला ते शशिकांत कारंडे यांच्या मुलीची गेल्या काही दिवसांपासून छेड काढत होते अशीही माहिती समोर आली आहे.
दुहेरी हत्याकांडाने जळगाव हादरलं, प्रेमीयुगुलाचा खून, भाऊच ठरला वैरी
धारदार शस्त्रांनी शशिकांत कारंडे यांच्यावर हल्ला
शशिकांत कारंडे हे जेव्हा त्यांच्या मुलीला घ्यायला शाळेत आले तेव्हा त्यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी हल्ला चढवला. शशिकांत कारंडे यांच्या डोक्यावर आणि मानेवर गंभीर जखलमा झाल्या. त्यांना रूग्णालयात नेलं जात होतं मात्र त्याचवेळी त्यांचा मृत्यू झाला. रूग्णालयात नेताच त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं आहे.
शशिकांत कारंडे हे त्यांच्या मुलीला घ्यायला आले होते. त्यावेळी शाळेच्या बाहेर हे अल्पवयीन हल्लेखोर फिरत होते. कारंडे त्यांची गाडी घेऊन मुलीच्या शाळेसमोर आले. त्यांच्या मुलीच्या डोळ्यांसमोरच त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.
या घटनेनंतर शशिकांत कारंडे रक्ताच्या थारोळ्यात पडले. त्यांच्यावर वार केल्यानंतर हल्लेखोर पळाले. या घटनेने एकच खळबळ माजली आहे. बारामतीचे डीवायएसपी गणेश इंगळे आणि पोलीस निरीक्षक सुनील महाडीक यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी आरोपींच्या शोधार्थ पथकं रवाना केली आहेत.
ADVERTISEMENT