Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांचे पुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांनी काही दिवसापूर्वी गुंड गजा मारणेची भेट घेतली होती, त्यावेळी राजकीय वर्तुळासह सामाजिक वर्तुळातही जोरदार खळबळ उडाली होती. त्यानंतर आता अट्टल गुन्हेगार असलेला असिफ महंमद इक्बाल शेख उर्फ असिफ दाढीने (Asif Muhammad Iqbal Shaikh aka Asif dadhi) अजित पवार यांची भेट घेतल्याने आता चर्चेला उधाण आले आहे. मात्र त्याने अजित पवारांची का भेट घेतली आहे त्याचे कारणमात्र अजून स्पष्ट झाले नाही. गेल्या काही दिवसांपासून राजकारण आणि गुन्हेगारी विश्वातील लोकांमुळे नेत्यांचीच जोरदार चर्चा होऊ लागली आहे.(Asif Dadhi criminal with many cases met Deputy Chief Minister Ajit Pawar the photo of the meeting created excitement in politics)
ADVERTISEMENT
अजित पवारांची काय प्रतिक्रिया
गुंड गजा मारणे आणि पार्थ पवारांची भेट झाल्यानंतर अजित पवारांनी त्याबद्दल प्रतिक्रिया देत पार्थ पवारांनी घेतलेली गजा मारणेची भेट चुकीचे असल्याचे त्यांनी जाहिरपणे सांगितले होते, मात्र आता अजित पवार या भेटीबद्दल काय बोलणार याकडेही साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
हे ही वाचा >> Uddhav Thackeray : ‘मोदीजी, तुम्ही आमचे शत्रु नाहीत’, ठाकरेंच्या ‘त्या’ विधानाची इतकी का होतेय चर्चा?
असिफ दाढी का भेटला?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्या असिफ महंमद इक्बाल शेख उर्फ असिफ दाढीची भेट घेतली. त्याच्यावर अनेक गुन्हे नोंद आहेत. काही दिवसांपूर्वी शस्त्रास्त्रांसह त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यामुळे असिफ दाढीची का भेट घेतली ते मात्र अजून स्पष्ट झालं नसलं तरी त्याने ठेवलेल्या कार्यक्रमासंदर्भात अजित पवारांची भेट घेतल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे.
राजकारणाचे वेद
अजित पवार आणि असिफ दाढीच्या भेटीनंतर अनेक गोष्टींच्या चर्चा केल्या जात आहेत. असिफ दाढीला राजकारणाचे वेद लागले आहेत. त्यातच तो तृतीय पंथियासाठी काम करणाऱ्या एका संस्थेबरोबरही काम करत असल्याची माहिती सूत्रांनी सांगितली. त्या कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यासाठी ते अजित पवारांकडे गेल्याचेही सांगण्यात येत आहे.
नेमकी काय पार्श्वभूमी?
आसिफ शेख उर्फ दाढीविरुद्ध पहिला गुन्हा हा 1988 मध्ये दाखल झाला होता. त्यावेळी त्याने पहिल्यांदाच प्राणघातक हल्ला केला होता. त्यानंतर त्याने गुन्हेगारी विश्वात येत अनेक प्रकारचे गुन्हे केले आहेत. 2021 पर्यंत त्याच्यावर आठ गुन्हे दाखल झाले आहेत. तर 1988 मध्येही त्याने हल्ला केला होता, त्याप्रकरणीही त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर 1996 आणि 2004 मध्ये कट रचून हत्या करण्याचा प्रयत्न, 2007 मध्ये अपहरण आणि हत्या, 2009 आणि 2011 मध्ये शस्त्रांचा वापर, परवाना नसताना शस्त्र बाळगण्याचा कट आणि 2021 मध्ये जीवे मारण्याची धमकी अशा वेगवेगळ्या गुन्ह्यात त्याचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ADVERTISEMENT