Maharashtra Election Results : बुथपासून बड्या नेत्यापर्यंत, योग्य मॅनेजमेंट करुन भाजपला यश मिळवून देणारे शिवप्रकाश कोण?

सुधीर काकडे

25 Nov 2024 (अपडेटेड: 25 Nov 2024, 07:27 PM)

भाजप नेते शिवप्रकाश यांनी उत्तम बुथ मॅनेजमेंट करुन राज्यात भाजपला जोरदार यश मिळवून दिलं आहे. राज्यातील 288 जागांपैकी तब्बल 133 जागा मिळवत भाजपने इतिहास रचला आहे.

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

भाजपच्या यशाचं गमक काय?

point

कोण आहेत शिवप्रकाश?

Maharashtra BJP Victory : राज्याच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप आणि महायुतीने 235 जागा जिंकत ऐतिहासिक विजय मिळवला. महायुतीच्या या विजयामागे अनेक कारणं असल्याचं सांगितलं जातं आहे. मात्र यशामध्ये महत्वाचा वाटा असलेलं एक नाव म्हणजे भाजपचे राष्ट्रीय सहसंघटन सरचिटणीस शिवप्रकाश. शिवप्रकाश यांचं भाजपच्या या यशामध्ये मोठं योगदान आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि उत्तराखंडच्या विधानसभा निवडणुकीतही भाजपच्या यशानंतर शिवप्रकाश यांच्या कामाचं कौतुक केलं जात होतं. 

हे वाचलं का?

2017 मध्ये उत्तराखंड आणि 2023 मध्ये मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा विजय कठीण मानला जात होता, मात्र त्यानंतर ही जबाबदारी शिवप्रकाश यांच्याकडे सोपवण्यात आली. शिवप्रकाश यांनी आपली मायक्रो मॅनेजमेंट प्लॅनिंग करुन राबवून भाजपला यश मिळवून दिलं. त्यानंतर या राज्यांमध्ये भाजपची सत्ता आली. तसंच 2017 च्या उत्तर प्रदेश निवडणुकीतही शिवप्रकाश यांच्या रणनीतीने भाजपला पुन्हा सत्तेत आणलं.

हे ही वाचा >> Sneha Dube: हितेंद्र ठाकूरांचा गड खालसा करणारी मर्दानी... सासऱ्यांचा खून, अन्...

लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात भाजपसाठी ही विधानसभा निवडणुका मोठ्या आव्हानात्मक मानल्या जात होत्या. मात्र जूनमध्ये लोकसभा निवडणूक झाल्यानंतर जून ते नोव्हेंबर या काळात शिवप्रकाश हे महाराष्ट्रात तळ ठोकून होते. त्यांनी संघटनेवर काम करत, लोकसभेला झालेल्या चुका दुरूस्त केल्या. यावेळी त्यांनी बुथ स्तरावरील कार्यकर्त्यांवर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या. त्यामुळे पक्ष आपल्यावर विश्वास ठेवून महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देत असल्याचा संदेश सर्व कार्यकर्त्यांमध्ये गेला. त्यामुळे भाजपचे मूळ मतदाराला मतदान केंद्रापर्यंत घेऊन येण्यात या कार्यकर्त्यांनी महत्वाची भूमिका बजावली.

शिवप्रकाश यांनी बूथची अ, ब, क आणि ड अशा चार श्रेणींमध्ये विभागणी केली. त्यापैकी ब आणि क बूथवर अधिक कार्यकर्त्यांची नियुक्ती करून त्यांनी बूथ जिंकण्यासाठी आवश्यक असलेलं प्लॅनिंग केलं. तसंच सर्व विधानसभेतील नाराज लोकांची आणि प्रभावशाली लोकांची यादी बनवली आणि त्यांच्याशी संपर्क साधून तिथे भाजपच्या उमेदवारासाठी पोषक वातावरण निर्माण केलं. तसंच कार्यकर्त्यांचे प्रश्न वरिष्ठ नेतृत्वापर्यंत पोहोचवून त्यांचे प्रश्न लवकरात लवकर सोडवण्यासाठी प्रयत्न केले. या सर्व बुथ मॅनेजमेंटमुळे भाजपला मोठा फायदा झाला. 

    follow whatsapp