Bihar News : बिहारमधील बेगुसरायमध्ये नवऱ्याने () पत्नीला टिकटॉक आणि रिल्स (Reels) बनवू नको, ते तू थांबव असं सांगितलं म्हणून सासरच्या लोकांनी त्याची हत्या (Murder) केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ही घटना खोडबंदपूर पोलिसात घडली आहे. या प्रकरणात ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, त्याचे नाव महेश्वर कुमार राय असे असून तो समस्तीपूर जिल्ह्यातील नरहान गावाचा रहिवासी होता. महेश्वरचा विवाह फाफौत गावातील राणी कुमारीसोबत 6-7 वर्षांपूर्वी झाला होता. महेश्वरची बायको ज्या दिवसांपासून रिल्स बनवत होती, तेव्हापासून मात्र त्यांच्यामध्ये कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून वाद होत होता. (bihar crime news wife strangles husband for telling him not to make reels on social media)
ADVERTISEMENT
व्हिडीओला विरोध
महेश्वर हा कोलकातामध्ये मजूरी करत होता, नुकताच तो घरी परतला होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्याची पत्नी सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ बनवत होती. मात्र ते व्हिडीओ बनवायला महेश्वर विरोध करत होता, त्याने केलेला विरोध हा तिला मान्य नव्हता आणि त्यावरूनच त्या दोघांमध्ये प्रचंड वादही झाला होता.
हे ही वाचा >> Shiv Sena : मंत्री शंभुराज देसाईंना त्यांच्याच माणसाकडून शिवीगाळ, चहामुळे…
भावाला आला संशय
महेश्वर हा रविवारी रात्री आपल्या पत्नीला भेटण्यासाठी सासरीवाडीला गेला होता. मात्र त्यावेळी सासरच्या लोकांनी आणि त्याच्या पत्नीने त्याचा गळा दाबून त्याची हत्या केली. त्यानंतर त्याच्या भावाने त्याला फोन केला होता, मात्र त्याने फोन न उचलता दुसऱ्यांनीच कोणी उचलला होता. त्यामुळे महेश्वरच्या बाबतीत काही तरी वेगळं घडल्याचा संशय त्याच्या भावाला आला होता.
वडिलांसमोरच मृतदेह
आपल्या भावाबाबत काही तरी विचित्र घडल्याचे रुदलला वाटले असल्याने त्याने आपल्या वडिलांना फफौतला जाण्यास सांगितले. तिथे गेल्यानंतर मात्र महेश्वरचा मृत्यू झाल्याचे त्याच्या वडिलांना समजले. त्यामुळे त्यांनी तात्काळ खोदावंदपूर पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी महेश्वरचा मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.
पत्नीच निघाली मुख्य आरोपी
महेश्वरच्या मृत्यूनंतर आता त्याच्या कुटुंबीयांनी त्याच्या बायकोबरोबरच तिच्या घराच्यावरही आरोप केला आहे. महेश्वरने बायकोला टिकटॉक आणि रिल्स बनवायला विरोध केला होता, त्यातूनच त्याची गळफास देऊन त्याला हत्या करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याच्या घरच्यांनी सांगितले की, तो कोलकातामध्ये कामाला होता, आणि दोन तीन दिवस राहून तो पुन्हा कामावर जाणार होता. मात्र त्याआधीच त्याची हत्या झाल्याचेही सांगण्यात आले. महेश्वरच्या हत्येप्रकरणा आता पोलिसात गुन्हा नोंद झाला असून त्याच्या पत्नीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
ADVERTISEMENT