Love and Crime: आईनेच पोटच्या लेकीला विकलं, मुलाला…; अन् प्रियकरासोबत झाली फरार!

रोहिणी ठोंबरे

29 Aug 2023 (अपडेटेड: 29 Aug 2023, 01:14 PM)

बिहारमधील मुझफ्फरपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिथे एका आईनेच आपल्या अल्पवयीन मुलीला प्रियकराशी लग्न करण्यासाठी विकलं आणि आपल्या मुलाला हॉस्टेलमध्ये सोडून प्रियकरासह पळून गेली. पीडित अल्पवयीन मुलगी मूळची झारखंड रांचीची आहे.

Bihar News The mother sold her Daughter left the boy in a hostel and ran away

Bihar News The mother sold her Daughter left the boy in a hostel and ran away

follow google news

Bihar Crime News : बिहारमधील मुझफ्फरपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिथे एका आईनेच आपल्या अल्पवयीन मुलीला प्रियकराशी लग्न करण्यासाठी विकलं आणि आपल्या मुलाला हॉस्टेलमध्ये सोडून प्रियकरासह पळून गेली. पीडित अल्पवयीन मुलगी मूळची झारखंड रांचीची आहे. पण तिचे कुटुंब वडिलांच्या कामाच्या निमित्ताने मुझफ्फरपूरमध्ये सदर पोलीस स्टेशन हद्दीतील गोरबशी येथे राहत होते. (Bihar News The mother sold her Daughter left the boy in a hostel and ran away for marrying With lover)

हे वाचलं का?

दोन वर्षांपूर्वी या अल्पवयीन मुलीच्या वडिलांचा मृत्यू झाला, त्यावेळी ती साडेबारा वर्षांची होती. यादरम्यान आईला घर चालवणं कठीण झालं होतं. अशावेळी महिलेचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध जुळले. तरुणाने तिच्याशी लग्न करण्यासही होकार दिला, परंतु मुलांना स्वीकारण्यास नकार दिला. यामुळे महिलेने तिच्या प्रियकराच्या मदतीने मुलीला अडीच लाख रुपयांना विकलं आणि मुलाला खासगी शाळेच्या हॉस्टेलमध्ये सोडून दिल्लीत आली.

Live in Partner Pressure Cooker: दुसऱ्यासोबत अफेअर असल्याचा संशय, प्रेशर कुकरने ठेचून लिव्ह-इन पार्टरनची हत्या

प्रियकरासोबत लग्न करण्यासाठी अल्पवयीन मुलगी विकली, मुलाला हॉस्टेलमध्ये सोडलं…

महिलेने आपल्या मुलाच्या हॉस्टेलचा खर्च जमा न केल्याने ही बाब उघडकीस आली. त्यानंतर याबाबतची माहिती हॉस्टेल चालवणाऱ्या व्यक्तीने कुटुंबातील अन्य सदस्यांना दिली. यानंतर मुलांचे आजोबा आणि काकांनी रांचीमध्ये झिरो एफआयआर दाखल केला.

Kolhapur: दारुबंदीवरुन महिलाच आमने-सामने, तुफान हाणामारी.. कोल्हापुरात काय घडलं?

यानंतर पोलिसांच्या बोलवण्यावरून मुलीचे आजोबा आणि काका रांचीहून मुजफ्फरपूरला पोहोचले आणि त्यांनी मुलीचा शोध सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांना मुलीच्या व्यवहाराची माहिती मिळाली आणि त्यांनी मध्यस्थ जोडप्याला पकडले. मुलगी सुखरूप बाहेर आली. आता पोलीस मुलीला विकणारी आई आणि तिच्या प्रियकराचा शोध घेत आहेत.

Chhagan Bhujbal: तेलगी प्रकरणात चार्जशीटमधील नाव खोडणारा अदृश्य हात कुणाचा?, जितेंद्र आव्हाडांच सूचक ट्वीट

आरोपी महिलेच्या शोधात पोलिसांचे ठिकठिकाणी छापे!

एएसपी टाऊन अवधेश दीक्षित यांनी सांगितले की, ‘रांचीच्या रातू पोलीस स्टेशनपासून मुझफ्फरपूरमधील सदर पोलीस स्टेशनपर्यंत शून्य एफआयआर नोंदवण्यात आला आहे. ज्यामध्ये मुलीच्या आजोबांनी तक्रार दाखल केली आहे की, त्यांच्या सूनेने, तिच्या प्रियकरासह नातीला विकलं आहे. त्यानंतर 35 वर्षीय तरुणाशी तिचं लग्न लावून दिलं. मुलीची आता सुखरूप सुटका करण्यात आली आहे. याप्रकरणी आणखी एका महिलेलाही अटक करण्यात आली आहे. मुलीच्या आईला अटक करण्यासाठी छापे टाकण्यात येत आहेत. तिला अटक केल्यानंतरच मुलीला किती रूपयांना विकलं हे समजेल.’

    follow whatsapp