Brij Bhushan Singh अडकणार! दिल्ली पोलिसांनी कोर्टाला ‘ते’ सगळं सांगितलं

भागवत हिरेकर

23 Sep 2023 (अपडेटेड: 23 Sep 2023, 12:56 PM)

महिला कुस्तीपटू प्रकरणात दिल्ली पोलिसांनी कोर्टात युक्तिवाद केला. ब्रिजभूषण शरण सिंह वर दिल्ली पोलिसांनी गंभीर आरोप केलेत. ब्रिजभूषण शरण सिंहला तो करत असलेल्या कृतीची जाणीव होती, असे पोलिसांनी सांगितले.

Delhi Police said that Brij Bhushan knew what he was doing. Whenever Brijbhushan got a chance. He used to try to outrage the modesty of female wrestlers.

Delhi Police said that Brij Bhushan knew what he was doing. Whenever Brijbhushan got a chance. He used to try to outrage the modesty of female wrestlers.

follow google news

Brij bhushan singh delhi police chargesheet : महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेले भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर आरोप निश्चित करण्यासाठी दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टात सुनावणी झाली. न्यायालयाने ब्रिजभूषण यांना हजर राहण्यापासून सूट दिली होती. सुनावणीदरम्यान दिल्ली पोलिसांनी न्यायालयात युक्तिवाद केला. यावेळी पोलिसांनी जी माहिती दिली, त्यावरून ब्रिजभूषण कायद्याच्या कचाट्यात अडकणार असंच दिसत आहे.

हे वाचलं का?

युक्तिवादात दिल्ली पोलिसांनी सांगितले की, ब्रिजभूषण यांना माहित होतं की ते काय करत आहेत. जेव्हा-जेव्हा ब्रिजभूषण यांना संधी मिळायची, तेव्हा तेव्हा ते महिला कुस्तीपटूंचा विनयभंग करण्याचा प्रयत्न करायचे. दिल्ली पोलिसांनी सांगितले की, पीडित मुलीने काही प्रतिक्रिया दिली की नाही हा प्रश्न नसून तिची काय चूक झाली हा प्रश्न आहे. सादर केलेले पुरावे ब्रिजभूषण यांच्यावर आरोप निश्चित करण्यासाठी पुरेसे आहेत, असंही पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी तक्रारदारांचा केला उल्लेख

या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान दिल्ली पोलिसांनी तक्रारदारांसोबत दिल्लीतील WFI कार्यालयात घडलेल्या घटनेचा उल्लेख केला आणि सांगितले की, या तक्रारींचे अधिकार फक्त दिल्लीतच आहेत. एका महिला कुस्तीपटूने सांगितले की, ताजिकिस्तानमधील एका कार्यक्रमादरम्यान ब्रिज भूषणने पीडितेला खोलीत बोलावले आणि जबरदस्तीने मिठी मारली. पीडितेने त्याला विरोध केल्यावर ब्रिजभूषण म्हणाला की, वडिलाच्या भावनेने हे केले. यावरून बृजभूषण यांना आपण काय करत आहोत हे माहीत असल्याचे स्पष्ट होते, असं पोलिसांचं म्हणणं आहे.

हेही वाचा >> ‘ऐ @#%$…’ भाजप खासदाराची लोकसभेत दुसऱ्या खासदाराला शिवीगाळ

दुसऱ्या तक्रारदाराच्या तक्रारीचा संदर्भ देत पोलिसांनी सांगितले की, ताजिकिस्तानमधील आशियाई चॅम्पियनशिपदरम्यान ब्रिजभूषणने पीडितेचा शर्ट परवानगीशिवाय वर उचलला होता आणि तिला अयोग्यरित्या स्पर्श केला होता.

आरोपींना जास्तीत जास्त तीन वर्षे कारावास

दिल्ली पोलिसांनी न्यायालयाला सांगितले की, जर भारतात एखाद्या महिलेविरुद्ध आयपीसीच्या कलम 354A अंतर्गत गुन्हा घडला तर आरोपीला जास्तीत जास्त तीन वर्षांची शिक्षा होऊ शकते. गुजरातमधील सोहराबुद्दीन चकमकीचा संदर्भ देत दिल्ली पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणातही अनेक एफआयआर स्वतंत्रपणे नोंदवण्यात आले होते, परंतु न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी एकाच ठिकाणी केली.

महिला कुस्तीपटूंनी केलेत आरोप

अलीकडेच सुनावणीदरम्यान महिला कुस्तीपटूंच्या वतीने वकील रेबेका जॉन यांनी महिला कुस्तीपटूंचा कधी आणि कुठे लैंगिक छळ झाला हे न्यायालयाला सांगितले. यामध्ये देशातील आणि परदेशातील ठिकाणांचा समावेश आहे.

हेही वाचा >> Shiv Sena MLAs case : शिंदे अपात्र झाल्यास भाजपचा प्लॅन बी काय? समजून घ्या 4 मुद्द्यांत

रेबेका जॉनने सांगितले की, एका महिला कुस्तीपटूने तिच्या तक्रारीत सांगितले की, तिने मंगोलियातील रिओ येथे 2016 च्या ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत भाग घेतला होता. हॉटेलच्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेलो. तिथे डायनिंग टेबलवर ब्रिजभूषणही बसले होते, मला तिथे बोलावण्यात आले. मी तिथे गेल्यावर ब्रिजभूषणने माझ्या छातीवर हात ठेवला आणि पोटापर्यंत हात नेला. त्यानंतर मी घाबरले आणि तिथून निघून गेले आणि जेवण करून माझ्या खोलीत आले.

हेही वाचा >> Women Reservation : 5 कारणं… महिलांना राजकारणात 33 टक्के आरक्षण का आवश्यक?

रेबेकाने असा युक्तिवाद केला होता की एका महिला कुस्तीपटूने सांगितले की, तिने ब्रिजभूषण यांना कधीही पुरुष कुस्तीपटूंची तपासणी करताना पाहिले नाही. ओव्हर साइट कमिटीच्या सदस्याच्या निवेदनात असे म्हटले आहे की, महिला कुस्तीपटूने ब्रिजभूषणने केलेल्या विनयभंगाची माहिती दिली होती. मात्र, तेथील व्हिडिओ रेकॉर्डिंग पुन्हा पुन्हा बंद केले जात होते. आणखी एका महिला कुस्तीपटूने तिच्या तक्रारीत म्हटले आहे की, तिच्याशी शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले गेले. ब्रिजभूषण म्हणाले की, ‘तू माझ्याशी तडजोड केलीस तर तुला कधीच अडचण येणार नाही.’ दरम्यान, आता या प्रकरणाची सुनावणी 7 ऑक्टोबरला होणार आहे.

    follow whatsapp