Buldhana Crime : बुलढाणा जिल्ह्यात बँकेतून पैसे काढण्यासाठी आलेल्या एका शेतकऱ्याने बँक मॅनेजरवर (Bank Manager) त्याच्याच केबिनमध्येच चाकूने हल्ला (Knife attack) केल्याची घटना घडली आहे. पैसे काढण्यासाठी शेतकऱ्याला बँक मॅनेजरकडून त्रास दिला जात असल्यामुळे रागाच्या भरात शेतकऱ्याने चाकू हल्ला केल्याचे सांगण्यात आले.
ADVERTISEMENT
मॅनेजरचा नाहक त्रास
शेतकरी किरण गायगोळ हे 13 फेब्रुवारी रोजी बुलढाण्यातील खामगाव शहरातील पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेत बचत गटाचे पैसे काढण्यासाठी आले होते.
मॅनेजरकडून कारणांची यादी
या प्रकरणाची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, शेतकऱ्याला पैसे काढण्यासाठी परवानगी देत नव्हता. पैसे काढण्यासाठी वेगवेगळी कारणं देत असल्याने पैसे काढण्यासाठी आलेला शेतकरी बँकेत दोन तास बसून होता.
थेट चाकून वार
बँक मॅनेजरच्या त्रासाला कंटाळून त्याच्या त्रासाला कंटाळून रागाच्या भरातच शेतकऱ्याने पिशवीतून आणलेल्या चाकूने पंजाब नॅशनल बँकेचे मॅनेजरवर चाकूने वार केला.
शेतकरीही जखमी
या हल्यात शंतनू राऊत जखमी झाले आहे. या हल्ल्यावेळी बँकेतील इतर अधिकाऱ्यांनी शेतकऱ्याला अडवण्याचा प्रयत्न केला असता त्याच्या हाताला चाकू लागून जखम झाल्याचे सांगण्यात आले. शेतकऱ्याने केलेल्या चाकूच्या हल्ल्यात जखमी झालेल्या बँक मॅनेजरला खामगावमधील सिल्वरसिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
शेतकऱ्याला अटक
बँक मॅनेजरवर चाकू हल्ला केल्या प्रकरणी आता शेतकऱ्याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे.
ADVERTISEMENT