Sambhajinagar Clerk Scam : कंत्राटी कर्मचाऱ्यानं संभाजीनगरमध्ये 21 कोटींचा घोटाळा कसा केला? नेमका काय झोल केला?

घोटाळ्याच्या पैशातून आरोपींनी 1.30 कोटी रुपयांची बीएमडब्ल्यू कारही विकत घेतली, 32 लाख रुपयांची बीएमडब्ल्यू बाईकही खरेदी केली. पण एवढी रक्कम नेमकी लाटली तरी कशी?

Mumbai Tak

मुंबई तक

26 Dec 2024 (अपडेटेड: 26 Dec 2024, 12:12 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

13 हजार महिना पगार, पण कोट्यवधी लाटले?

point

कंत्राटी कर्मचाऱ्यानं घोटाळा केला तरी कसा?

Sambhajinagar Clerk 21 Crore Scam : छत्रपत्री संभाजीनगरमध्ये भ्रष्टाचाराचा एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय क्रीडा उपसंचालक कार्यालयात कार्यरत असलेल्या एका संगणक परिचालकाने बनावट कागदपत्रांद्वारे शासकीय तिजोरीतून तब्बल 21 कोटी 59 लाख रुपयांचा घोटाळा केला आहे. आरोपी हर्षल कुमार अनिल क्षीरसागर याची फेब्रुवारी 2022 मध्ये प्रति महिना १३ हजार रुपये पगारावर नियुक्ती करण्यात आली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी 1 जुलै ते 7 डिसेंबर 2024 दरम्यान हा घोटाळा केला. 

हे वाचलं का?

घोटाळा कसा केला? 

हे ही वाचा >> Supreme Court on ED : सर्वोच्च न्यायालयाचा ED ला मोठा दणका! लॅपटॉप, मोबाईल जप्त करुन डेटा...

सरकारी खात्यातून मोबाईल आणि ईमेलवर नेट बँकिंगची सुविधा सुरू करून या कर्मचाऱ्यानं हा बनावट व्यवहार केला. या पैशातून आरोपीने आपल्या प्रेयसीला खूश करण्यासाठी चार बेडरुमचा आलिशान फ्लॅट घेतला. तसंच, त्याच्या मित्रालाही दुसरा फ्लॅट गिफ्ट केला.

21 कोटी 59 लाखांचा घोटाळा

घोटाळ्याच्या पैशातून आरोपींनी 1.30 कोटी रुपयांची बीएमडब्ल्यू कारही विकत घेतली, 32 लाख रुपयांची बीएमडब्ल्यू बाईकही खरेदी केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीची सहकारी यशोदा शेट्टी आणि तिचा पती बी.के. जीवनलाही अटक केली आहे. मात्र, मुख्य आरोपी हर्षल अद्याप फरार आहे.

हे ही वाचा >> Supreme Court on ED : सर्वोच्च न्यायालयाचा ED ला मोठा दणका! लॅपटॉप, मोबाईल जप्त करुन डेटा...

याप्रकरणी विभागीय क्रीडा उपसंचालक कार्यालयाने जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा संभाजीनगर आर्थिक गुन्हे शाखा कसून तपास करत आहे. संभाजीनगरच्या पोलीस उपायुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस आरोपीच्या मालमत्तेची चौकशी करत असून हर्षलचा शोध सुरू आहे.


 

    follow whatsapp