Basti gangrape case : उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. गँगरेपनंतर पीडितेचा अतिरक्तस्रावामुळे मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी एकूण दोन आरोपींना अटक केली आहे.
ADVERTISEMENT
आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 5 जून रोजी रात्री 10 च्या सुमारास घडली. ही अल्पवयीन मुलगी सायंकाळी बाजारातून भाजी घेण्यासाठी घराबाहेर पडली होती. बराच उशीर होऊनही मुलगी घरी न पोहोचल्याने नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली. त्याचवेळी कछिया-बियुपूर रस्त्यावरील एका शाळेजवळ एका मुलीचा मृतदेह पडल्याची माहिती मिळाली. मुलीचे कुटुंबीय घटनास्थळी पोहोचले आणि पोलिसांनाही या प्रकरणाची माहिती देण्यात आली.
आरोपीचे भाजपशी संबंध
अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांनुसार, बिरौपूर येथील रहिवासी मोनू निषाद याने गावातील एका व्यक्तीला मृतदेहाबाबत माहिती दिली होती. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार पीडितेच्या आईने मोनू निषाद, राजन निषाद आणि कुंदन सिंग यांच्यावर तिच्या मुलीवर बलात्कार करून हत्या केल्याचा आरोप केला आहे.
हेही वाचा >> सुसंस्कृत पुणे हादरलं, अल्पवयीन मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत बायकोने पतीचा घरातच काढला काटा
तिन्ही आरोपी भाजपशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे. रिपोर्टनुसार, कुंदन सिंह हे भाजप किसान मोर्चा गौर मंडळाचे उपाध्यक्ष आहेत. तर उर्वरित दोन आरोपी भाजपचे कार्यकर्ते असल्याचे सांगण्यात येत आहे.
हेही वाचा >> Mumbai : “ती म्हणायची सुरक्षारक्षकाची भीती वाटते”, ‘त्या’ तरुणीने वडिलांना काय सांगितलं होतं?
पोलिसांनी केलेल्या चौकशीत मोनू निषादने सांगितले की, तो पीडितेला गेल्या सहा-सात महिन्यांपासून ओळखत होता. 5 जून रोजी संध्याकाळी त्याने तिला फोन करून भेटायला बोलावले. त्यानंतर तो अल्पवयीन मुलाला कुंदन सिंगच्या घरी घेऊन गेला. जिथे तिच्यावर बलात्कार करण्यात आला. तिथे जास्त रक्तस्त्राव झाल्याने मुलीचा मृत्यू झाला. आरोपींनी अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिचा मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकून दिला.
रक्ताच्या थारोळ्यात सापडले कपडे
माहितीनुसार, पोलिसांनी आरोपीच्या सांगण्यावरून या घटनेशी संबंधित अनेक पुरावेही गोळा केले. कुंदन सिंगच्या घरात पोलिसांना रक्ताने माखलेली चादर आणि काही कपडे सापडले. पोलीस तपास आणि पोस्टमॉर्टममध्ये पीडितेवर बलात्कार झाल्याची पुष्टी झाली आहे. अतिरक्तस्त्राव आणि न्यूरोच्या दुखापतीमुळे मुलीचा मृत्यू झाला.
याप्रकरणी सध्या पोलिसांनी तीन आरोपींपैकी दोघांना अटक केली आहे. तिसऱ्याचा शोध सुरू आहे. घटनेनंतर गावातील नागरिकांकडून आरोपींवर कारवाईची मागणी होत आहे. याबाबत बिरौपूर चौकात लोकांनी रास्ता रोको करून पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. पोलिस अधिकाऱ्यांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतरच रास्ता रोको मागे घेण्यात आला.
ADVERTISEMENT