Cyber Crime News: एका महिला (Lady) आणि तिच्या भावाच्या (Brother) फोटोसोबत छेडछाड करून ते फोटो (obscene photos) सोशल मीडियावर पोस्ट केल्याप्रकरणी एका 19 वर्षीय तरुणीला दिल्ली पोलिसांनी अटक केल्याचं वृत्त समोर आलं आहे. पोलिसांनी मंगळवारी याबाबतची ही माहिती दिली. पोलिसांनी सांगितले की, तरुणीला महिलेच्या भावाचा बदला घ्यायचा होता. कारण तरुणीचा असा आरोप आहे की, महिलेच्या भावाने तिची प्रतिमा खराब केली होती. (cyber crime 19 year old girl was defaming brother and sister by making obscene photos)
ADVERTISEMENT
दरम्यान, या प्रकरणी एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ‘तक्रारदार महिलेने असा आरोप केला आहे की, कोणी तरी तिच्या फोटोशी छेडछाड करून ते अश्लील फोटो हे सोशल मीडियावर पोस्ट केल्याचा आरोप तक्रारदार महिलेने केला आहे.’
नेमकं प्रकरण काय?
पोलिसांनी सांगितले की, तरुणीने महिलेला आणि तिच्या भावाला त्रास देण्यासाठी आणि बदनामी करण्यासाठी सोशल मीडियावर तिच्या भावाच्या मोबाइल नंबरसह अपमानजनक संदेश प्रसारित केले. त्याचवेळी त्यांच्या नातेवाइकांना देखील अश्लील मेसेजह पाठवले.
अधिक वाचा- ज्या मुलीच्या हत्येप्रकरणी पिता-पुत्र गेले तुरुंगात, ती आली परत; मग सापडलेला मृतदेह कुणाचा?
पोलीस उपायुक्त (उत्तर) सागर सिंग कलसी म्हणाले, ‘तपासादरम्यान पोलिसांना आढळून आले की, गुन्ह्यात वापरण्यात आलेला मोबाइल क्रमांक 19 वर्षीय मुलीच्या आईच्या नावावर नोंदवला गेला आहे. त्यानंतर उत्तर पश्चिम दिल्लीतील इंद्रलोक भागात राहणाऱ्या मुलीला शनिवारी पकडण्यात आले.
महिलेचा हवाला देत पोलिसांनी सांगितले की, ती तक्रारदाराच्या भावाला ओळखते आणि ते चांगले मित्र आहेत. मात्र, त्याच्या भावाने अज्ञात कारणांमुळे परिसरात आपली प्रतिमा डागाळण्यास सुरुवात केली होती. याचा बदला घेण्यासाठी तिने त्या व्यक्तीचे आणि त्याच्या बहिणीचे फोटो अश्लील पद्धतीने दिसतील अशी छेडछाड करून ते सोशल मीडियावर शेअर केले. तसंच त्यांच्या कुटुंबाची बदनामी करण्यासाठी काही आक्षेपार्ह कमेंट्सही केल्या.
नवऱ्याने बायकोचे बेडरुममधील प्रायव्हेट व्हिडीओ केले शेअर
पती-पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. या घटनेत एका पतीने (Husband) आपल्याच पत्नीचे बेडरूमच्या सीसीटीव्हीत कैद झालेले प्रायव्हेट (Private Video) व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या घटनेनंतर महिलेची बदनामी झाली आहे. या प्रकरणी महिलेने आता पोलिस (police) ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर आरोपी पतीचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे.
अधिक वाचा- जितेंद्र आव्हाडांच्या बॉडीगार्डने रेल्वेसमोर घेतली उडी; कारण आलं समोर
खरं तर लग्नात नवऱ्याकडच्यांकडून लग्नात कारची मागणी करण्यात आली होती. मात्र कार देण्यास मुलीकडच्यांनी नकार दिला होता. यावरून दोघा पती-पत्नीमध्ये (Husband-wife) खुप वाद झाला. पतीने पत्नीला मारहाण देखील केली होती. या मारहाणीनंतर पत्नी घर सोडून माहेरी गेली होती. माहेरी जाऊन पत्नीने पतीविरोधात घरगूती हिंसाचार प्रकरणी (Domestic Voilence Act 2005) तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी पतीची चौकशी केली होती.
अधिक वाचा- Tamil Nadu: किरकोळ कारणावरून 9वर्षीय इन्स्टा क्वीनची गळफास लावून आत्महत्या
पतीने (Husband) तक्रार मागे घेण्यासाठी पत्नीवर दबाव टाकला होता. पण पत्नीने (Wife) ज्यावेळेस त्याला नकार दिला त्यावेळेस पतीने पत्नीचे बेडरूममधले सर्व प्रायव्हेट व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्याची धमकी दिली होती. मात्र पत्नीने तक्रार मागे न घेतल्याने त्याने पतीने पत्नीचे बेडरूममधले सर्व प्रायव्हेट व्हिडिओ सोशल मीडियावर टाकले होते. इतकेच नाही तर स्वताच्या व्हाट्सअप स्टेटसवर देखील ठेवले होते.
ADVERTISEMENT