Kalyan Murder Case: कल्याण: दादर रेल्वे स्थानकात एका बॅगेत मृतदेह आढळून आल्याची घटना ताजी असतानाच, कल्याण-नगर मार्गालगतच्या कचरापट्टीत एका बॅगेत अनोखळी वयोवृध्द इसमाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कल्याण ग्रामीण तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या वरप गावातील गावदेवी मैदान येथे मृतदेह असलेली ही बॅग आढळून आली आहे. याप्रकरणी कल्याण तालुका ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात हत्या आणि पुरवा नष्ट करणं या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आता पोलिसांनी तपास सुरू केला आहे. (dead body of an elderly person was found in a bag near the kalyan ahmednagar highway varap village garbage dumping area)
ADVERTISEMENT
नेमकी घटना काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज (15 ऑगस्ट) सकाळच्या सुमारास कल्याण-मुरबाड मार्गावरील वरप गावात खुल्या भूखंडावरील कचरापट्टीत एका वयोवृध्द इसमाचा मृतदेह मिळून आला. हा मृतदेह एका निळा रंगाच्या लगेज बॅगेत होता. भूखंडावर पसरलेल्या कचऱ्यात ही बॅग पडली होती.
हे ही वाचा>> Yashashree Shinde : ऑफिसला गेलेल्या यशश्रीचा मृतदेहच सापडला! चेहरा, गुप्तांगावर...
लघुशंका करण्यासाठी आलेल्या एका तरुणाला ती बॅग दिसली. त्याने जेव्हा बॅग ही खोलली तेव्हा त्याला प्रचंड धक्का बसला. कारण या बॅगेत मृतदेह असल्याचे त्याला आढळून आले. त्याने तात्काळ कल्याण ग्रामीण पोलिसांना या घटनेची माहिती दिली.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांच्या पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि तात्काळ शवविच्छेदनासाठी मध्यवर्ती रुग्णालय येथे पाठविण्यात आला. घटनेचे गांभीर्य ओळखून ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. स्वामी, उप पोलीस अधीक्षक जगदीश शिंदे यांनी घटनास्थळी भेट देत तपासाबाबत मार्गदर्शन केले.
हे ही वाचा>> Nagpur : दोघं OYO मध्ये गेले अन् नग्नावस्थेतच तो आला बाहेर, नागपुरात काय घडलं?
आता या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी परिसरातील तसेच कल्याण- मुरबाड मार्गावरील शंभरहून अधिक सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले असून घटनास्थळी डॉग स्कॉड आणि ठाणे गुन्हे शाखेचे पथकही दाखल झाले होते.
तसेच कल्याण तालुका ग्रामीण पोलीस पथकाने मृतदेहाची ओळख पटवणे आणि गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी समांतर तपास सुरू केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांनी दिली आहे.
ADVERTISEMENT