Delhi Crime : ग्रेटर नोएडा वेस्टमध्ये रविवारी क्रिकेट खेळत असताना तिघा तरुणांनी एका कॅब ड्रायव्हरची हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नो-बॉलवरून (No Ball) झालेल्या वादानंतर आरोपींनी कॅब चालकाला (Cab Driver) मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र विटेने मारून त्याची हत्या करण्यात आली. विटेने थेट डोक्यावर वार केल्याने त्याचा तोल जाऊन तो नाल्यात पडला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र ते सापडले नाहीत.
ADVERTISEMENT
बॅटने डोकं फोडलं
या दुर्घटनेत ठार झालेला 24 वर्षीय सुमित कुमार हा मूळचा मेरठचा असून तो साई उपवन कॉलनी, चिपियाना ग्रेटर नोएडामध्ये राहत होता. मोकळ्या वेळेत तो कॅब चालवायचा आणि क्रिकेटही खेळत होता. रविवारी दुपारीही सुमित हा कॉलनीतील काहीजणांसोबत मैदानात क्रिकेट खेळत होता. यावेळी सुमित हा फलंदाजी करत असल्याचं सांगण्यात येत आहे. तर आरोपींच्या बाजूने हिमांशू आणि इतर काही जण फिल्डिंग करत होते. क्रिकेट खेळत असताना सुमितने नो बॉल देण्यास सांगितला होता. त्यानंतर नो बॉलवरून दोन्ही संघामध्ये वाद झाला आणि त्यावरून हाणामारी सुरु झाली. यावेळी त्याच्या डोक्यात बॅटने वार करण्यात आला.
हे ही वाचा >> Ajit Pawar : शरद पवारांवरील ‘त्या’ वक्तव्यावर अजित पवारांचा खुलासा, ‘ज्येष्ठ नेत्यांनी…’
वीट डोक्यात हाणली
नो बॉलचा वाद इतका टोकाला गेला की, सुमितला दुसऱ्या टीममधील मुलांनी बॅटने मारण्यास सुरुवात केली. त्याला लाथाबुक्यांनीही मारहाण करण्यात आली. त्यावेळी सगळ्यांनी त्याला मारहाण करण्यास सुरुवात केल्याने त्याने तिथून पळून जाण्याचाही प्रयत्न केला. मात्र तो पळून जाताना एकट्याने त्याला वीट फेकून मारली. त्यावेळी त्याच्या डोक्यात वीट बसल्याने त्याचा तोल जाऊन तो नाल्यात कोसळला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.
लोकांची बघ्याची भूमिका
सुमितला मारहाण करण्यात येत होती, त्यावेळी घटनास्थळी वीस पेक्षा जास्त लोकं उपस्थित होती. मात्र त्यावेळी त्याला कोणीही वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. तर अनेक जणांनी त्याला मारहाण करताना फक्त बघ्याची भूमिका घेतली होती. क्रिकेटच्या वादातून तरुणाची हत्या झाल्याचे समजताच पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरु आहे.
ADVERTISEMENT