Assembly Election Results : पवार Vs पवार आणि ठाकरे Vs शिंदे, किती ठिकाणी लढले, किती आमदार पाडले? वाचा सविस्तर

मुंबई तक

25 Nov 2024 (अपडेटेड: 25 Nov 2024, 05:25 PM)

राज्यात दोन पक्ष फुटल्यानंतर होणारी ही पहिलीच विधानसभा निवडणूक होती. या निवडणुकीत महायुतीने विक्रमी जागा जिंकल्यात. तसंच दोन आघाड्यांमध्ये तर सहा प्रमुख पक्षांमध्ये पार पडली.

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीची बाजी

point

ठाकरे आणि शिंदेंच्या शिवसेनेत किती ठिकाणी लढत?

point

दोन्ही राष्ट्रवादींचे किती आमदार भिडले?

Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला असून, महायुतीने महाविकास आघाडीचा अक्षरश: सुपडा साफ केलाय. आता निकालानंतर कोण किती मतांनी जिंकलंय. तिथपासून ते कुणाचं डिपॉझिट जप्त झालंय इथपर्यंत चर्चा सुरु आहेत. राज्यात दोन पक्ष फुटल्यानंतर होणारी ही पहिलीच विधानसभा निवडणूक होती. या निवडणुकीत महायुतीने विक्रमी जागा जिंकल्यात. यंदाची विधानसभा निवडणूक दोन आघाड्यांमध्ये तर सहा प्रमुख पक्षांमध्ये पार पडली. शिंदेंची शिवसेना विरुद्ध ठाकरेंची शिवसेना अशी थेट लढत 53 जागांवर झाली, तर शरद पवारांची राष्ट्रवादी विरुद्ध अजित पवारांची राष्ट्रवादी असा थेट सामना 38 जागांवर झाला. आणि भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत 75 ठिकाणी झाली. या लढतीत कोण किती जागा जिंकलंययासोबतच दोन्ही शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादीच्या उमेदवारांमध्ये झालेल्या लढती चर्चेत होत्या.

हे वाचलं का?

विधानसभा निवडणुकीत शिंदेंची शिवसेना विरुद्ध ठाकरेंची शिवसेना अशी थेट लढत 53 मतदारसंघात झाली. यात शिंदेंच्या शिवसेनेला 38 जागांवर यश मिळालं, तर ठाकरेंच्या शिवसेनेला फक्त 15 जागा जिंकता आल्या. यात शिंदेंच्या शिवसेनेला 48 टक्क्यांहून अधिक मतं मिळालीत, तर ठाकरेंच्या शिवसेनेला 35 टक्के मतं मिळाली आहेत. या निकालात एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंवर भारी पडलेत असं सध्या बोललं जातंय. 

हे ही वाचा >> Tutari vs Trumpet: 'तुतारी' वाजलीच नाही! 'पिपाणी'ने केला शरद पवारांच्या 'एवढ्या' उमेदवारांचा घात?

288 मतदासंघापैकी 38 मतदारसंघात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आणि अजित पवारांचे उमेदवार आमनेसामने होते, यात अजित पवारांचे उमेदवार 29 उमेदवार जिंकले. तर शरद पवारांना फक्त 7 जागांवर विजय मिळवता आला. यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 47 टक्के मतं मिळाली. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 47.5 टक्के मतं मिळाली. निकालातून शरद पवारांपेक्षा अजित पवार वरचढ आहेत असं दिसतंय.


तसेच काँग्रेस विरुद्ध भाजप या राष्ट्रीय पक्षांमध्ये 75 मतदारसंघांमध्ये लढत झाली. यामध्ये भाजपला 64 जागा जिंकता आल्या. तर काँग्रेसला फक्त 11 जागी विजय मिळवता आला. यात भाजपला 50 टक्के मतं मिळाली. तर काँग्रेसला 37 टक्क्यांपर्यंत मतं मिळाली. काँग्रेस आणि भाजपची लढत झाल्यास मतदारांची भाजपलाच पसंती असल्याचं दिसून येतंय.

    follow whatsapp