Devendra Fadnavis : "तो पुन्हा येतोय...!", मुख्यमंत्रीपदाच्या चर्चा सुरू असतानाच 'टीम देवेंद्र'कडून खास व्हिडीओ रिलीज

मुंबई तक

25 Nov 2024 (अपडेटेड: 25 Nov 2024, 04:26 PM)

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपचे थेट 132 उमेदवार निवडून आणत देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:ला सिद्ध केल्याचं दिसतंय.

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

"तुम्हा आम्हा सर्वांचा लाडका आपला देवाभाऊ,पुन्हा आपल्या सेवेत येतोय"

point

टीम देवेंद्र या एक्स अकाऊंटवरील व्हिडीओची चर्चा

राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये यंदा भाजपला घवघवीत यश मिळालं आहे. राज्यात मागच्या पाच वर्षांमध्ये घडलेल्या घडामोडी पाहता देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत कसोटीची होती. कारण लोकसभा निवडणुकीत झालेल्या महायुतीच्या पराभवानंतर विरोधकांकडून त्यांच्या नेतृत्वावर सवाल उपस्थित करण्यात आला होता. तसंच राज्यातील दोन प्रादेशिक पक्षांमध्ये पडलेल्या फुटीसाठीही देवेंद्र फडणवीस यांनाच जबाबदार धरत विरोधकांकडून टीका करण्यात आली होती. त्यानंतर आता यंदाच्या निवडणुकीत भाजपचे थेट 132 उमेदवार निवडून आणत देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:ला सिद्ध केल्याचं दिसतंय. त्यानंतर आता 'टीम देवेंद्र' नावाच्या एक्स अकाऊंटवर एक खास व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यामुळे मुख्यमंत्रीपदाबद्दल सुरू असलेल्या चर्चांमध्ये या व्हिडीचीही चर्चा होते आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा >> Ashok Chavan : "ज्यांनी ज्यांनी मला त्रास दिला, ते...", पृथ्वीराज चव्हाण, थोरात, पटोलेचं नाव घेत काय म्हणाले चव्हाण?

राज्यात झालेल्या 2019 च्या विधानसभा निवडणुकांनंतर मुख्यमंत्रीपदाचा शब्द पाळला नाही म्हणत उद्धव ठाकरे यांनी वेगळी भूमिका घेतली आणि काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. त्यानंतर भाजप संकटात असल्याचं चित्र निर्माण झालं होतं. यादरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्यावर पोलीस बदली घोटाळ्याचेही आरोप करण्यात आले होते. त्यानंतर त्यांची चौकशीही करण्यात आली होती. या सर्व गोष्टींचा उल्लेख या व्हिडीओमध्ये केलेला दिसतो आहे. 

तो पुन्हा येतोय...!

तुम्हा आम्हा सर्वांचा लाडका आपला देवाभाऊ,पुन्हा आपल्या सेवेत येतोय.@Dev_Fadnavis pic.twitter.com/nYmxpPnjG3

"तो पुन्हा येतोय...! तुम्हा आम्हा सर्वांचा लाडका आपला देवाभाऊ,पुन्हा आपल्या सेवेत येतोय." असं ट्विट करत एका कवितेच्या माध्यमातून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. वापस आना पडता है या कवितेच्या माध्यमातून तो पुन्हा येतोय असं सूचक विधानही या पोस्टमध्ये करण्यात येतं आहे. 


हे ही वाचा >>Assembly Elections Result : मविआच्या आमदारांची संख्या घटली; पवार, राऊत, चतुर्वेदींच्या राज्यसभा खासदारकीचं काय होणार?

 

राज्यात लोकसभा निवडणुकीत भाजपला आणि महायुतीला मोठा पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांना, नेत्यांना बळ देण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी केलं. मागच्या काही दिवसांमध्ये भाजपने मोठी मेहनत घेतल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे या यशाचं श्रेय भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांना दिलं जातंय. तसंच भाजपने मिळालेल्या आमदारांचा आकडाही मोठा आहे. त्यामुळे भाजपचाही फडणवीसांना मुख्यमंत्री करावं असा आग्रह असणार आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची भूमिका काय असणार हे सुद्धा पाहावं लागणार आहे. त्यामुळे अखेर काय निर्णय होणार आणि मुख्यमंत्री कोण होणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. 

    follow whatsapp