Devraj Patel Passed Away : सोशल मीडियावर ‘दिल से बुरा लगता है भाई’, ‘प्लिज भाई’ या मीममुळे सोशल मीडियावर चर्चेत आलेल्या युट्यूबर देवराज पटेल याचे निधन झाल्याची घटना समोर आली आहे. एका रस्ते अपघातात देवराज पटेल याचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. या वृत्ताला छत्तीसगढचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी दुजोरा दिला आहे. आता देवराज पटेल याच्या निधनाने नेटकरी शोक व्यक्त करत आहेत. (devraj patel death comedian in road accident chhattisgarh cm bhupesh baghel dil se bura lagta hai bhai social media memes)
ADVERTISEMENT
‘दिल से बुरा लगता है’ या वाक्याने करोडो नागरीकांच्या हृद्यात आपले स्थान निर्माण करणारे व आम्हाला सर्वांना हसवणारे देवराद पटेल हे आज आपल्याला सोडून गेले आहेत, अशी देवराज पटेलच्या निधनाची माहिती मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी ट्विट करून दिली आहे. तरुण वयात आश्चर्यकारक प्रतिभा गमावणे खूप दुःखदायक आहे. देव त्याच्या कुटुबियांना दु:ख सहन करण्याची शक्ती देवो, अशा शब्दात भुपेश बघेल यांनी श्रद्धांजली देखील वाहिली आहे.
रस्ते अपघातात निधन
रायपुरच्या तेलीबांधा ठाणे हद्दीतील लाभांडीजवळ छत्तीसगढचे प्रसिद्ध कॉमेडी युट्यूबर देवराज पटेल यांचे रस्ते अपघातात निधन झाल्याची घटना घडली आहे. एका भरधाव ट्रकने बाईकला मागून धडक दिली होती. या धडकेत युट्यूबर देवराज पटेल यांचा जागीच मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनूसार, रायपूरच्या लाभांडीजवळून देवराज आणि त्याचा मित्र बाईकने जात होते. यावेळी मागून आलेल्या भरधाव ट्रकने त्यांच्या बाईकला जोरदार धडक मारली होती. या अपघातात देवराज पटेल यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर मित्राला गंभीर दुखापत झाल्याची माहिती आहे.सध्या देवराज यांच्या मित्राला रूग्णालयात उपचारासाठी दाखल केल्याची माहिती आहे.
पोलिसांचे म्हणणे काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाईक हा देवराजचा मित्र चालवत होता. या अपघातात मागे बसलेल्या देवराज पटेलचे जागीच निधन झाले. तर देवराजचे मित्र या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. देवराजच्या मित्राला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.तर देवराजचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. याचसोबत आता देवराज पटेल यांच्या बाईकला धडक देणाऱ्या ट्रकचा शोध घेण्यात येत आहे. दरम्यान या देवराज पटेल यांच्या निधनाने आता सोशल मीडियावर शोक व्यक्त करण्यात येत आहे.
देवराज पटेल हा ‘दिल से बुरा लगता है भाई’, ‘प्लिज भाई’ या मीममुळे सोशल मीडियावर चर्चेत आला होता. देवराज पटेलने युट्युबर भूवन बामच्या ढिंढोरा या सीरीजमध्येही काम केले आहे.देवराज पटेलचे युट्यूबवर 1 लाख सब्सक्रायबर्स असून 56 हजार फॉलोवर्स आहेत.
ADVERTISEMENT