Dhananjay Deshmukh On Walmik Karad: 'वाल्मिक कराडला मकोका आणि खुनाच्या गुन्ह्यात आरोपी करा, धनंजय देशमुख कुटुंबासह टॉवरवर चढून आंदोलन करणार बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात एसआयटीने आतापर्यंत आठ आरोपींना अटक केली आहे. आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. परंतु, खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडवर मोक्का लावा आणि खुनाच्या गुन्ह्यात आरोपी करा, अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली आहे. उद्या कुंटुंबासह मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन करण्याचा इशाराही देशमुखांनी माध्यमांशी बोलताना दिला आहे.
ADVERTISEMENT
धनंजय देशमुख काय म्हणाले?
धनंजय देशमुख यांनी कुटुंबासह मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन करणार असल्याचं म्हटलं आहे. देशमुख म्हणाले, खंडणी ते खून प्रकरणातील जे आरोपी आहेत, त्यांना शिक्षा झाली पाहिजे. खंडणी ते खून प्रकरण काय कनेक्शन आहे, हे सीआयडीने ज्या दिवशी सुनावणी झाली, त्या दिवशी स्पष्ट केलं होतं. त्यावरच आरोपीला 15 दिवसांचा पीसीआर दिला होता. जर या आरोपीला (वाल्मिक कराड) मोक्का आणि 302 मध्ये खुनाच्या आरोपात जर नाही घेतलं, तर उद्या दहा वाजेपासून माझं वैयक्तीक कुटुंबाचं मोबाईल टॉवरवर आंदोलन सुरु होईल. टॉवरवर जाऊन मी स्वत:ला संपवून घेतो. त्याचं कारण असं आहे की, हे जर आरोपी यातले सोडले, तर उद्या हे पण माझा निर्घृण पद्धतीनं खून करतील. मग माझ्या कुटुंबात न्याय मागणारा कुणीच नसेल. मी उद्या दहा वाजता टॉवरवर चढून संपवून घेणार आहे.
हे ही वाचा >> CM Devendra Fadnavis : "लाडक्या बहिणींना मदत करतोय आणि...", शिर्डीत CM देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधानं!
हा गुन्हा खंडणीतूनच झालेला आहे. सहा तारखेला हे खंडणी मागायलाच आले होते. 28 मे पासून माझ्या भावाच्या मृत्यूपर्यंतचा सर्व कालावधी आहे, तो सर्व खंडणीतूनच घडलेला आहे. तिथे हे दुसऱ्या वेगळ्या कामाला आले नव्हते. जर मला न्याय मिळत नसेल, मला सर्व माहिती भेटत नसेल, तर मी माझा स्वत:चा निर्णय घेतलेला बरा आहे. मी आणि माझे कुटुंबीय उद्या हा निर्णय घेतोय, मी गांभीर्याने सांगतोय की माझ्या भावासोबत जी गोष्ट घडली, ती उद्या परत हे करतील. म्हणून माझी ही भूमिका आहे. मी उद्या दहा वाजता माझ्या आंदोलनाला सुरुवात करेल. टॉवरवर जाणार आहे आणि मला संपवून घेणार आहे. खंडणी ते खूनापर्यंतचे जे आरोपी आहेत, त्याला जाणीवपूर्वक बाहेर काढलं जातंय. आम्हाला माहिती दिली जात नाही. मी मुख्यमंत्री साहेबांवर विश्वास ठेवला. माझा सर्वांवर विश्वास आहे, असं मी बोलतोय. पण यंत्रणा जर आम्हाला माहिती देत नसेल, कुणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न करत असेल, तर आमच्या न्याय मागण्याला काहीच अर्थ नाही, असंही देशमुख म्हणाले.
हे ही वाचा >> Bhau Torsekar : "शरद पवार टॅलेंटेड माणूस, मोदींनाही मागे टाकू शकेल असा...", काय म्हणाले भाऊ तोरसेकर?
ADVERTISEMENT
