Donald Trump : भाषण करत असतानाच ट्रम्प यांच्यावर झाडल्या गोळ्या, बघा व्हिडीओ

मुंबई तक

14 Jul 2024 (अपडेटेड: 14 Jul 2024, 10:25 AM)

Shooting at a Donald Trump rally : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. सभेत भाषण करताना त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या.

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे.

डोनाल्ड ट्रम्प हे गोळीबारात जखमी झाले आहेत.

follow google news

बातम्या हायलाइट

point

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ला

point

भाषण करत असताना शूटरने झाडल्या गोळ्या

point

ट्रम्प यांच्या कानाला घासून गेली गोळी

Donald Trump Injured : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. या हल्ल्यात डोनाल्ड ट्रम्प जखमी झाले. ट्रम्प शनिवारी रात्री पेनसिल्व्हेनियातील बटलर येथील एका रॅलीला संबोधित करत असताना त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आली. ट्रम्प यांच्या उजव्या कानाच्या वरच्या भागाला एक गोळी लागली. सीक्रेट सर्व्हिसच्या अधिकाऱ्यांनी हल्लेखोराला ठार केले. या घटनेत रॅलीसाठी आलेल्या एकाचा मृत्यू झाला, तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. (Donald Trump injured in shooting at Pennsylvania rally)

हे वाचलं का?

या गोळीबाराच्या घटनेचा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये ट्रम्प भाषण करत असताना गोळ्या झाडल्याचे दिसत आहे. डोनाल्ड ट्रम्प उजव्या हाताने आपला कान झाकतात आणि मंचाच्या मागे झुकतात.

हेही वाचा >> 40 कोटींची संपत्ती, मग पूजा खेडकरांना नॉन-क्रिमिलेअरचे प्रमाणपत्र कसे मिळाले? 

सीक्रेट सर्व्हिस एजंट लगेच त्यांच्यापर्यंत पोहोचतात. ट्रम्प व्यासपीठाच्या मागून उठतात आणि रॅलीत आलेल्या लोकांकडे वज्रमूठ दाखवत धैर्याचा संदेश देतात. त्यांच्या उजव्या कानावर आणि चेहऱ्यावर रक्त दिसत आहे. या हल्ल्यानंतर ट्रम्प यांनी 'ट्रूथ सोशल' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

अशी घटना घडणे आश्चर्यकारक आहे -डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प यांनी लिहिले आहे की, 'पेनसिल्व्हेनियामधील बटलर येथे झालेल्या गोळीबाराला त्वरित प्रतिसाद दिल्याबद्दल मी युनायटेड स्टेट्स सीक्रेट सर्व्हिस आणि सर्व यंत्रणांचे आभार मानतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या रॅलीत मारल्या गेलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाप्रती आणि गंभीर जखमी झालेल्या अन्य व्यक्तीच्या कुटुंबाप्रती मी माझ्या संवेदना व्यक्त करतो. आपल्या देशातही असे कृत्य घडू शकते, यावर विश्वास बसत नाही."

गोळी माझ्या उजव्या कानाला टोचली -डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प या घटनेबद्दल म्हणाले, 'मला गोळी लागली होती जी माझ्या उजव्या कानाच्या वरच्या भागाला लागून गेली. मला लगेच कळले की काहीतरी गडबड आहे, मला शिट्टीचा आवाज आला, गोळी झाडली गेली आणि लगेच जाणवले की गोळी माझ्या त्वचेला टोचली आहे. खूप रक्तस्त्राव झाला होता, मग वाटलं काय होतंय."

यूएस सीक्रेट सर्व्हिसने हल्लेखोर मारला

यूएस सीक्रेट सर्व्हिसचे प्रवक्ते अँथनी गुग्लिएल्मी यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी 6:15 वाजता ही घटना घडली. जेव्हा संशयित शूटरने रॅलीच्या ठिकाणाहून उंच स्थानावरून स्टेजच्या दिशेने अनेक गोळ्या झाडल्या. ते म्हणाले की, 'यूएस सीक्रेट सर्व्हिस एजंट्सने हल्लेखोराला ठार केले.

हेही वाचा >> 'शरद पवारांचेच मत फुटले', जयंत पाटलांच्या पराभवाचे कारण समोर 

माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प सुरक्षित आहेत. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला असून, दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेची चौकशी सुरू असून सीक्रेट सर्व्हिसने एफबीआयला माहिती दिली आहे.

मिलवॉकीमध्ये रिपब्लिकन राष्ट्रीय अधिवेशन सुरू होण्याच्या दोन दिवस आधी ही धक्कादायक घटना घडली, जिथे डोनाल्ड ट्रम्प औपचारिकपणे पक्षाचे उमेदवार बनतील.

    follow whatsapp