Pradeep kurulkar : डीआरडीओचे शास्त्रज्ञ प्रदीप कुरूळकर (Pradeep kurulkar) यांनी पाकिस्तानी एजंट झारा दासगुप्ताला अग्नी, ब्रम्होस आणि रूस्तम मिसाईल संबंधित गुप्त माहिती शेअर केल्याची माहिती काही दिवसांपुर्वीच समोर आली होती. या संबंधित व्हाट्सअॅप चॅट देखील समोर आले होते. या घटनेने खळबळ माजली असतानाच आता प्रदीप कुरूळकर यांच्याबाबत आणखीण एक धक्कादायक खुलासा झाला आहे. यामध्ये कुरूळकर दोन महिलांना नोकरीचे आमीष देऊन लैंगिक शोषण केल्याचीही घटना समोर आली आहे. या घटनेने आता खळबळ माजली आहे. (drdo scientist pradeep kurulakar sexual abuse two women in office toilet pune ats chargesheet)
ADVERTISEMENT
डीआरडीओचे शास्त्रज्ञ प्रदीप कुरूळकर यांनी पुणे एटीएसने (Pune ATS) अटक केली आहे. तसेच एटीएसने 1837 पानांची चार्जशीट न्यायालयात सादर केली आहे. या चार्जशीटमध्ये प्रदीप कुरूळकर यांच्या सर्व कृत्याची या चार्जशीटमध्ये माहिती दिली आहे. प्रदीप कुरूळकर यांनी पाकिस्तानी एजंटला झारा दासगुप्ता अग्नी, ब्रम्होस आणि रूस्तम मिसाईल संबंधित गुप्त माहिती शेअर केली होती, या संबंधित व्हॉटस्अॅप चॅटची देखील माहिती समोर आली होती.
हे ही वाचा: Pradeep kurulkar : ‘झारा’ला सांगितलं ब्रह्मोसचं ‘सीक्रेट’, बाईच्या नादात…
दरम्यान आता या व्हॉटस्अॅप चॅटसोबत प्रदीप कुरुलकर यांच्याबाबत आणखीण एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये प्रदीप कुरुलकर यांनी डीआरडीओच्या कार्यालयातील बाथरूममध्ये दोन महिलांचे लैंगिक शोषण केल्याची घटना समोर आली आहे. याबाबतचे जबाब पीडीत महिलांनी एटीएसकडे नोंदवले आहेत.
चार्जशीटनुसार, दोन महिलांनी नोकरीचे आमीष देऊन प्रदीप कुरूलकर यांनी लैगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. एटीएसने या दोन महिलांची चौकशी केली होती. या चौकशीत पीडित महिलांनी खुलासा केला की, प्रदीप कुरूलकर यांनी शौचालयात बोलावून लैंगिक शोषण केले होते. नोकरीचे आमीष दाखवून त्यांनी हे कृत्य केल्याची माहिती दिली आहे. एटीएसने न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात महिलांच्या आरोपांचा देखील समावेश आहे.
दरम्यान प्रदीप कुरूलकर यांना अटक केल्यापासून त्यांच्याबाबत अनेक खुलासे समोर येत आहे. आता आणखीण खुलासे समोर येण्याची शक्यता देखील आहे. त्यामुळे प्रदीप कुरूलकर यांचा पाय आणखीण खोलात जाण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT