Crime : एक्स बॉयफ्रेंडने हद्दच ओलांडली! बॉयफ्रेंडची चाकूने हत्या, तर गर्लफ्रेडचं…

मुंबई तक

• 11:54 AM • 09 Jul 2023

सुरतमध्ये एक्स बॉयफ्रेंडने (EX boyfriend)गर्लफ्रेंडच (Girlfriend) अपहरण करून तिच्या बॉयफ्रेंडची निघृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हत्याकांडात पोलिसांनी (Police) अपहरण झालेल्या तरूणीची सुटका करून एक्स बॉयफ्रेंडला अटक केली आहे.

ex boyfriend killed girlfriend new lover murder girlfriend kidnapped gujrat crime news

ex boyfriend killed girlfriend new lover murder girlfriend kidnapped gujrat crime news

follow google news

देशभरात प्रेमप्रकरणातून हत्या करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. नुकत्याच घडलेल्या पुण्यातील दर्शना पवार हत्या प्रकरणाने आणि दिल्ली साक्षी हत्याकांडाने हे अधोरेखीत झाले आहे. आता अशीच एक घटना सुरतवरून समोर आली आहे. या घटनेत एका एक्स बॉयफ्रेंडने (EX boyfriend) गर्लफ्रेंडच (Girlfriend) अपहरण करून तिच्या बॉयफ्रेंडची निघृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हत्याकांडात पोलिसांनी (Police) अपहरण झालेल्या तरूणीची सुटका करून एक्स बॉयफ्रेंडला अटक केली आहे. या घटनेचा अधिक तपास सुरू आहे. (ex boyfriend killed girlfriend new lover murder girlfriend kidnapped gujrat crime news)

हे वाचलं का?

सुरतच्या (Surat) पाटीचाल परीसरात राहणारी पूजा अनीश अयूब सोडावाला नावाच्या तरूणासोबत नात्यात होती. मात्र नंतर पूजा आणि अनीशमध्ये कोणत्या तरी कारणावरून ब्रेकअप झाले होते. या ब्रेकअपनंतर पुजा चिराग उर्फ अन्नूसोबत नात्यात होती. पुजाच्या या नवीन नात्याची माहिती एक्स बॉयफ्रेंड (EX boyfriend) अनीश सोडावालाला कळताच त्याने तिच्या अपहरणाचा डाव रचला आणि थेट तिचे घर गाठले.

हे ही वाचा : Crime : ‘सॉरी जान.. 2 दिवस उशीर झाला’, फोटो शेअर केला अन् नवविवाहितेने…

अनीश सोडावाला 5 जूलैला पूजाच्या घरीच पोहोचला आणि तिला धमकावू लागला. तसेच तिचे अपहरण करण्याचा प्रयत्न करू लागला. यावेळी गर्लफ्रेंज पुजाच्या बचावासाठी तिचा दुसरा बॉयफ्रेंड चिरागमध्ये आला होता. यावेळी अनिशने थेट काढत चिरागवर जीवघेणा हल्ला केला.या हल्ल्यात चिराग गंभीर जखमी झाला. या घटनेनंतर अनिशने पूजाची केस ओढत तिला घराबाहेर नेत अपहरण केले.

या घटनेत जखमी झाल्यानंतर चिरागला त्याच्या कुटुंबियांनी रूग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती सुरतच्या वराछा ठाणे पोलिसांना मिळताच, त्यांनी तत्काळ चिरागच्या कुटुंबियांची भेट घेत संपूर्ण माहिती मिळवली. यानंतर पोलीसांनी पुजाचे अपहरण करून पळ काढणाऱ्या अनिश सोडावालाचा शोध सुरु केला. ह्युमन इंटेलिजेंस आणि टेक्निकल सर्विसच्या आधारावरून अनिशला ट्रेस करून जीआयडीसी परीसरातून अटक करण्यात आली. तसेच अनिशच्या ताब्यातून तिची सुटका केली. या घटनेचा अधिक तपास सुरु आहे.

    follow whatsapp