Extra Marital affairs Crime : 21 वर्षांची तरुणी. काम करत असताना बॉसचा तिच्यावर आणि तिचा बॉसवर जीव जडला. दोघांमध्ये नंतर शारीरिक संबंधही प्रस्थापित झाले. बॉससोबत तरुणीचं नाते मात्र लपून राहिले नाही. बॉसच्या पत्नीपर्यंत हे प्रकरण गेले आणि तरुणीला कायमचा जीव गमवावा लागला. या प्रकरणात पोलिसांनी पाच जणांना अटक केलीये.
ADVERTISEMENT
ही घटना आहे उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील. ‘पती-पत्नी और वो’ असं हे प्रकरण आहे. हे घडलंय गाझियाबादमधील मुरादनगर पोलीस स्टेशन हद्दीत. झालं असं की, 21 वर्षीय तरुणी रागिणीचे बंटी नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. बंटी हा रागिणीचा बॉस होता.
दोघेही नोएडामध्ये एकत्र प्रॉपर्टी डिलिंगचे काम करायचे. या दोघांमध्ये बरेच दिवस प्रेमप्रकरण सुरू होते. याबद्दल बंटीच्या पत्नीलाही कळले होते. त्यांच्या प्रेमप्रकरणामुळे तरुणाची पत्नी खूप नाराज असायची. पण बंटी रागिणीला सोडायला तयारच नव्हता.
राखीने भावाची घेतली मदत
पत्नी राखीने पती बंटीला हे सोडून देण्यास सांगितले. समजूतीनंतरही बंटीने त्याची गर्लफ्रेंड रागिणीला भेटणे थांबवले नाही. दोघांमधील प्रेमप्रकरणामुळे राखी आणि बंटी यांच्यात दुरावा येण्यास सुरुवात झाली.
वाचा >> Titwala crime news : पत्नीने घोटला गळा, अन्…; पोस्टमार्टेम रिपोर्टमुळे फुटलं बिंग
दरम्यान, राखीने तिचा भाऊ अमितला या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. यानंतर रक्तरंजित खेळ सुरू झाला. राखीने तिचा भाऊ अमितसोबत मिळून रागिणीच्या हत्येचा कटच रचला.
रागिणीला कसं संपवलं?
कट रचल्यानंतर अमितने रागिणीला बहीण राखीला भेटण्यासाठी घरातून बाहेर बोलावलं. त्यानंतर त्याच्या साथीदारांनी तिला शस्त्राचा धाक दाखवून गाडीत बसवलं. ते रागिणीला सुराणा गावातील हिंडण नदीच्या काठावर घेऊन गेले. तेथे त्यांनी रागिणीची गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर मृतदेह पुलावरून खाली फेकून सर्वांनी पळ काढला.
मृतदेह मिळाला आणि गूढ उकललं
या प्रकरणी डीसीपी ग्रामीण विवेक चंद्र यादव यांनी सांगितले की, 3 ऑगस्ट रोजी मुरादनगर पोलीस स्टेशनमध्ये मुलीचा मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. रागिनी असे या तरुणीचे नाव असून ती नोएडा येथील रहिवासी आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांना मिळाले. यामध्ये 2 ऑगस्टच्या रात्री मयत रागिणीला घेण्यासाठी अमित त्याच्या कारमधून तिच्या घरी गेल्याचे दिसत आहे.
कुणाला करण्यात आलीये अटक?
या प्रकरणाच्या तपासानंतर पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणात 5 जणांना अटक केली आहे. या कटात राखी, तिचा भाऊ अमित, त्याचे दोन मित्र करण, अंकुर आणि तिचा नवरा बंटी यांचाही सहभाग आहे. सध्या दोन जण फरार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले असून, फरार असलेल्यांनीच शस्त्र पुरविली होती.
वाचा >> Crime: मुलांसोबत सैतानी कृत्ये! गुप्तांगात भरली मिरची पावडर, मानवी मूत्र पाजलं अन्…
पोलिसांनी राखीचा पती बंटीलाही अटक केली आहे. कारण त्याला रागिणीची हत्या करण्यात आल्याचे कळले. त्यानंतर त्याने पत्नीला वाचवण्यासाठी पुरावे नष्ट करण्याचे काम केले.
ADVERTISEMENT