गाझियाबाद: एका महिलेने तिच्या सासऱ्याला क्रिकेट बॅटने मारहाण करत त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये घडली आहे. सुनेनं तिच्या सासऱ्याची क्रिकेट बॅटने ठेचून ठार मारलं.. आता या प्रकरणात पोलिसांनी सुनेला अटक केली आहे.
ADVERTISEMENT
दरम्यान, याप्रकरणी सुनेने असं म्हटलं आहे की, तिच्या सासऱ्याची तिच्यावर वाईट नजर होती. तो अनेकदा छेडाछाडही करायचा. दरम्यान, अचानक तो खोलीत घुसला आणि अश्लील कृत्ये करू लागला. हे पाहून सुनेला राग आला आणि तिने सासऱ्याची हत्या केली.
हे ही वाचा>> Nashik Crime : नाशिकमध्ये भरदिवसा मुलीचं अपहरण, व्हायरल CCTV व्हिडीओच्यामागे निघाली वेगळीच घटना
पतीच्या मृत्यूनंतर सासरीच राहत होती महिला
ही संपूर्ण घटना उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील कविनगर पोलीस स्टेशन परिसरातील गोविंदपुरम येथील आहे. काल (22 मार्च) संध्याकाळी, पोलिसांना शांतीकुंज येथील घर क्रमांक डी-273 येथे एका व्यक्तीची हत्या झाल्याची माहिती मिळाली. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना घराच्या आत आणि बाहेर रक्त पसरलेले दिसले.
पोलिसांनी दार उघडले तेव्हा पाती सिंह (वय 63 वर्ष) यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. तपासात असे दिसून आले की, सून आरती (वय 25 वर्ष) हिने तिच्या सासऱ्याची हत्या केली होती. आरोपी आरतीने सांगितले की, तिच्या पतीचे 4 वर्षांपूर्वी निधन झाले होते. तेव्हापासून ती तिच्या सासऱ्यांकडे राहत होती.
सुनेला काढलेलं घराबाहेर
तपासादरम्यान अशी माहिती समोर आली की, सासरे आणि सुनेमध्ये मालमत्तेवरून वाद होता. त्यामुळे सासऱ्यांनी तिला घराबाहेर काढले होते. पण, काही महिन्यांपूर्वी न्यायालयाच्या आदेशानंतर, आरती पुन्हा एकदा तिच्या सासरच्या घरी राहण्यास आली होती. आरती म्हणते की तिच्या सासऱ्यांची तिच्यावर वाईट नजर होती.
हे ही वाचा>> Disha Salian : नाईट पार्टी, कॉकटेल आणि 14 व्या मजल्याची गॅलरी... दिशाच्या फ्लॅटमध्ये काय घडलं होतं?
सासऱ्याची होती वाईट नजर
मिळालेल्या माहितीनुसार, सून आरतीने पोलिसांना सांगितले की, तिचे सासरे तिचा छळ करायचे. घटनेच्या दिवशीही सासरच्यांनी तिच्याशी गैरवर्तन करायला सुरुवात केली. यामुळे तिला राग आला आणि तिने सासऱ्यावर थेट क्रिकेट बॅटने हल्ला केला. सुनेने कबूल केले आहे की तिने तिच्या सासऱ्याच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर बॅटने अनेक वेळा वार केला, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.
आता आरती या प्रकरणात पोलीस कोठडीत आहे. आरतीने ज्या बॅटने तिच्या सासऱ्याची हत्या केली होती ती बॅट पोलिसांनी जप्त केली आहे. दरम्यान, या प्रकरणात डीसीपी सिटी राजेश कुमार म्हणाले की, आरोपी महिला, म्हणजेच मृताची सून, पोलिस कोठडीत आहे आणि चौकशीदरम्यान तिने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
ADVERTISEMENT
