Gadchiroli Murder Case: व्येंकटेश दुडमवार, गडचिरोली: गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील बुर्गी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुंडापुरी गावात 6 डिसेंबर रोजी एका झोपडीत तीन मृतदेह आढळून आले होते. देवू कुमोटी (60), श्रीमती बिच्छे देवू कुमोटी (55) आणि दहा वर्षांच्या अर्चना तलांडी यांची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना समोर आली होती. मात्र, आता ही हत्या पोटाच्या मुलानेच केल्याचं समोर आलं आहे. ज्यामध्ये त्याला त्याच्या काही नातेवाईकांनी मदत केल्याचंही तपासात उघड झालं आहे. (fearing black magic the boy killed his parents crime in gadchiroli)
ADVERTISEMENT
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, सुरुवातीला या घटनेची तक्रार मृताच्या मुलानेच पोलिसांत दिली होती. ज्यानंतर या तिहेरी हत्याकांडप्रकरणी पोलिसांनी पाच पथके तयार करून तपास सुरू केला होता. दरम्यान, पोलिसांच्या चौकशीत तक्रार दिलेल्या मुलाने पोलिसांना असं सांगितलं की, अज्ञात व्यक्तीने त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली होती.
हे ही वाचा>> जावयाचा जीव सासूवर जडला, अंधारात चाळे सुरू असतानाच बायको आली अन्…
मात्र, प्राथमिक तपासात ही वस्तुस्थिती समोर आली नाही, त्यामुळे पोलिसांचा संशयाची सुई ही कुटुंबीयांकडे वळली. मृत देवू कुमोटी हे या भागातील प्रमुख आदिवासी पुजारी होते.
देवू कुमोटी हा करणी करुन लोकांना आजारी पाडतो आणि यानंतर त्यांचा मृत्यू होतो. असा संशय गुंडापुरी व परिसरात पसरला होता. मात्र, तपासात पोलिसांना यात काहीही तथ्य आढळून आले नाही.
पण लोकांमध्ये याबाबत राग आहे असं सातत्याने कुमोटी कुटुंबातील इतर लोकांना वाटत होतं. परिसरातील लोक संतप्त आहेत असंही त्यांना वाटलं. म्हणून घरातील सदस्यही चिंतेत होते. यातून सुटका करून घेण्यासाठी मृताच्या दोन नातेवाईकांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी सहा महिने अगोदरच खुनाचा कट रचून दोघांची हत्या केली.
हे ही वाचा>> आठ मुलींच्या बापानं केला दुसऱ्या लग्नाचा विचार, पत्नीला समजताच थेट सुपारीच…
तर सुट्टीसाठी आलेल्या 10 वर्षांच्या नातीचाही यावेळी हत्या करण्यात आली. पोलिसांनी मृताच्या मुलांपैकी १) रमेश कुमोटी, २) विनू कुमोटी (तक्रारदार) आणि कुटुंबीय ३) जोगा कुमोटी, ४) गुणा कुमोटी, ५) राजू आत्राम (येमला), ६) नागेश उर्फ गोलू येमला, ७) सुधा येमला, ८) कन्ना हिचामी, सर्व रहिवासी गुंडापुरी आणि मृताच्या जावई 9) तानाजी कंगाली यांना अटक केली.
ADVERTISEMENT