Rajsthan Accident : राजस्थानमधील अलवरमध्ये झालेल्या कार अपघातातील (Car Accident) छायाचित्र आणि सीसीटीव्हीमुळे (CCTV Footage) अनेकांना धक्का बसला आहे. तर नुकताच त्या अपघाताचा एक सीसीटीव्हीही समोर आला आहे. त्यामध्ये वेगाने जाणारी कार एक्स्प्रेस वेवरून (Express Way) थेट खाली असलेल्या 150 मीटर अंतरावरील भिंतीवर आदळल्याचे दिसून येत आहे.
ADVERTISEMENT
झोप आणि कारचा वेग
दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर झालेल्या या अपघातात माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांची सून आणि मानवेंद्र सिंह यांच्या पत्नी चित्रा सिंह यांचा मृत्यू झाला आहे. तर माजी खासदार मानवेंद्र सिंह आणि त्यांचा मुलगा हमीर सिंह गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातामागचं नेमकं कारण चालकाला आलेली झोप आणि कारचा वेग ही कारणं सांगितली जात आहेत.
कारचा अतिवेग
प्रत्यक्षदर्शींनी सांगितली की, चालकाचा कारवरील ताबा सुटला आणि कार रस्त्याच्या कडेला असलेल्या संरक्षण भिंतीला जाऊन धडकली. अपघातावेळी कारचा वेग किमान ताशी 160 किलो मीटर होता असं सांगण्यात येत आहे.
हे ही वाचा >> BMC: शिंदे-भाजपच्या आमदारांना कोट्यवधी.. ‘मविआ’च्या आमदारांचे हात रिकामेच’!
झोपेमुळं ताबा सुटला
अपघाता घडल्यानंतर ती कार महामार्ग सोडून सुमारे 150 मीटर अंतरावर असलेल्या एका कच्च्या रस्त्याला असलेल्या संरक्षण भिंतीवर जाऊन धडकली होती. अपघातानंतर पंचनामा करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, कारच वेग ताशी 160 किलोमीटर होता. त्यातच चालकाच्या डोळ्यात झोप असल्याने कारवरील ताबा सुटला आणि कार भिंतीवर जाऊन धडकली.
कार भिंतीवर आदळली
अपघात झाल्यानंतर पोलिसांनी चालकाला विचारल्यानंतर त्याने सांगितले की, कारमधील सगळ्यांनाच झोप येत होती. त्यावेळी चालकाला झोप आली आणि डुलकी लागताच कारवरील ताबा सुटला आणि रस्त्याखाली जाऊन कार कोसळली. कारचा वेग प्रचंड असल्याने कार हवेत उडून खाली असलेल्या भिंतीवर जाऊन आदळली.
एअरबॅग उघडल्याच नाहीत
कार मानवेंद्र सिंह यांच्या चालक चालवत असताना कारमध्ये समोर त्यांचा मुलगा बसला होता, तर पाठीमागच्या बाजूला मानवेंद्र सिंह आणि त्यांची पत्नी बसली होती. मात्र कार आदळताच कारमधील समोर असलेल्या एअरबॅग उघडल्या गेल्यामुळे मानवेंद्र सिंह यांचा मुलगा आणि चालक त्या अपघातात वाचले. तर मानवेंद्र सिंह आणि त्यांची पत्नी बसलेल्या ठिकाणची एअरबॅग खुली झाली नसल्याने त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात मानवेंद्र सिंह यांच्या बरगड्या मोडल्या असून त्यांच्या हाताचे हाडही मोडले आहे.
प्रशासनाची धावपळ
दिल्ली मुंबई एक्स्प्रेस वेचे मेन्टेनन्स मॅनेजर शंकर सिंह यांनी सांगितले की, अपघातानंतर कारमधील सर्वजण बाहेर फेकले गेले होते. त्यानंतर तात्काळ त्यांना अलवरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले. हा अपघात कोणत्या तरी नेत्याचा झाल्याचे समजले होते, मात्र ती कार मानवेंद्र सिंह यांची होती हे अनेकांना माहिती नव्हते असंही त्या मॅनेजरने सांगितले.
ADVERTISEMENT