Fake IAS Officer : पोलिसांना सोबत घेतलं, हॉटेल-रिसॉर्ट मालकांना धमकावलं; तोतया IAS अधिकाऱ्याचे प्रताप वाचा

26 डिसेंबरच्या रात्री तो टॅक्सीने कळंगुटला पोहोचला तेव्हा त्याने येथे तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना आपण आयएएस अधिकारी असल्याचं सांगितलं आणि पोलिसांना आपलं ओळखपत्र दाखवल्यानंतर आपल्यासोबत येण्यास सांगितले. स्थानिक पोलिसांना सोबत घेऊन, या तोतयाने क्लब आणि हॉटेल चालकांना धमकावलं.

Mumbai Tak

मुंबई तक

• 05:40 PM • 29 Dec 2024

follow google news

बातम्या हायलाइट

point

तोतया IAS अधिकाऱ्याचे प्रताप ऐकून थक्क व्हाल

point

स्थानिक पोलिसांच्या मदतीनेच हॉटेल, पब चालकांना धमकावलं

आयएएस अधिकारी असल्याचं सांगत क्लब आणि रिसॉर्ट व्यावसायिकांमध्ये भीती निर्माण करणारा छत्तीसगडचा अभियंता मनोज कुमार याला उत्तर गोवा पोलिसांनी अटक केली. संशयित मनोज कुमार 5 डिसेंबर रोजी उमटवाडा-कळंगुट येथील लांबना रिसॉर्टमध्ये आला. तिथे त्याने रूम बुक केली होती. तिथून त्यानं टॅक्सी भाड्यानं घेतली. त्यानं टॅक्सी चालकाला सांगितलं की, तो ओडिशाचा आयएएस अधिकारी आहे आणि लवकरच त्याची गोव्यात बदली होणार आहे.

हे वाचलं का?

20 डिसेंबर रोजी आरोपी आपल्या मैत्रिणीसोबत हॉटेलमध्ये पोहोचला होता. त्यांनं त्या टॅक्सी चालकाला पुन्हा फोन करून गोव्यात आल्याचं सांगितलं. 26 डिसेंबरच्या रात्री तो टॅक्सीने कळंगुटला पोहोचला तेव्हा त्याने येथे तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना आपण आयएएस अधिकारी असल्याचं सांगितलं आणि पोलिसांना आपलं ओळखपत्र दाखवल्यानंतर आपल्यासोबत येण्यास सांगितले.

हे ही वाचा >> Urmila Kothare: अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या भरधाव कारने दोघांना चिरडलं, एकाचा मृत्यू

त्याने कळंगुट पोलिसांना काही ठिकाणी पाहणी करायची असल्याचं सांगून काही कर्मचाऱ्यांना सोबत येण्याचे आदेश दिले. संशयिताला सोबत घेऊन कर्मचारी तपासणीसाठी आले होते. सर्वप्रथम सदर व्यक्तीने बागा येथील दोन क्लब आणि शेक व्यावसायिकांना व्यवसाय बंद करण्याचा इशारा दिला.

त्यांनी बनावक अधिकाऱ्याने स्थानिक पोलिस कर्मचाऱ्यांसह बागा येथील टिटोज क्लबला भेट दिली आणि तिथेही त्यांनी क्लबच्या सदस्यांना रात्री उशिरापर्यंत दुकानं आणि हॉटेल्स उघडे ठेवू नका आणि मोठ्या आवाजात गाणी वाजवू नका असा इशारा दिला. यावेळी त्यांनी क्लब मालकांना काही क्लब बंद करण्याची धमकीही दिली.

 

हे ही वाचा >> ATS Action on Bangladeshi : बांगलादेशी घुसखोरांविरोधात कारवाईला सुरूवात, राज्यभरातून 16 जणांना अटक

 

दरम्यान, संशयित हा बनावट आयएएस अधिकारी असल्याचं समजल्यानंतर कळंगुट पोलीस ठाण्यातील हवालदार नारायण नरसे (४५) यांनी बी.एच. बनावट अधिकाऱ्याविरुद्ध कलम ३१८, २०४, १३२, २०५, ३१९, ३०८ (६) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

गोव्यातील हॉटेल, रेस्टॉरंट, क्लब, कॅसिनोमध्ये आयपीएस अधिकारी म्हणून बनावट अधिकारी दाखवून धमक्या देण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. काही बनावट अधिकारी पैशासाठी गोव्यातील हॉटेल क्लब बंद करण्याची धमकीही देत ​​होते.

उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक अक्षत कौशल यांनी सांगितलं की, ही बाब कळंगुट पोलिसांच्या निदर्शनास येताच त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. या व्यक्तीने कळंगुट पोलिसांचा वापर करून क्लब आणि हॉटेल मालकांना धमकावले आहे.

    follow whatsapp